शिर्डी विमानतळ
साचा:माहितीचौकट विमानतळ शिर्डी विमानतळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील शिर्डीच्या १४ किमी नैऋत्येस काकडी गावाजवळ असलेले एक विमानतळ आहे. ह्या विमानतळाचे बांधकाम महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने हाती घेतले व यासाठी एकूण बांधकामखर्च सुमारे साचा:रुपया ३४० कोटी लागला आहे. १ ऑक्टोबर २०१७ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन झाले आहे.
ह्या विमानतळामुळे शिर्डीच्या साईबाबा मंदिराला भेट देणाऱ्या लाखो भक्तांना विमानाने शिर्डीला प्रवास करण्याची संधी उपलब्ध होईल.