संघमित्रा बंडोपाध्याय

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट शास्त्रज्ञ संघमित्रा बंडोपाध्याय (जन्म 1968) एक भारतीय संगणक शास्त्रज्ञ आहेत, ज्यांनी संगणकीय जीवशास्त्रात विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. त्या भारतीय सांख्यिकी संस्था, कोलकाता येथे प्राध्यापिका असून, त्या २०१० साठी अभियांत्रिकी विज्ञानातील शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार विजेत्या तसेच अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञान श्रेणीतील इन्फोसिस पारितोषिक २०१७ च्या विजेत्या आहेत. [१][२] त्यांचे प्रामुख्याने उत्क्रांती गणन, नमुना ओळख, मशीन लर्निंग आणि बायोइन्फॉरमॅटिक्स या क्षेत्रात संशोधन केले आहे. [३]
१ ऑगस्ट २०१५ पासून, त्या भारतीय सांख्यिकी संस्थेच्या संचालिका आहेत, आणि त्या संस्थेच्या कोलकाता, बेंगळुरू, दिल्ली, चेन्नई आणि तेजपूर येथे असलेल्या सर्व पाच केंद्रांच्या कामकाजावर देखरेख करतात, तसेच भारतभर पसरलेल्या इतर अनेक सांख्यिकीय गुणवत्ता नियंत्रण आणि ऑपरेशन रिसर्च युनिट्सचे काम पाहतात.[४] भारतीय सांख्यिकी संस्थेच्या त्या पहिल्या महिला संचालक आहेत. सध्या त्या पंतप्रधानांच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम सल्लागार समितीवर आहेत.

शिक्षण आणि कारकीर्द

संघमित्रा बंदोपाध्याय यांनी प्रेसिडेन्सी कॉलेज, कोलकाता येथून भौतिकशास्त्रात विज्ञानाची पदवी प्राप्त करण्यापूर्वी १९९२मध्ये कलकत्ता विद्यापीठाच्या राजाबाजार विज्ञान महाविद्यालयातून संगणक विज्ञान विषयात (तंत्रज्ञानाची) दुसरी पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी भारतीय सांख्यिकी संस्था येथे मधून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त करण्यापूर्वी, १९९८ मध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था खरगपूर येथे पीएच्.डी प्राप्त केली.[५]

पुरस्कार आणि सन्मान

  • विज्ञान आणि अभियांत्रिकीसाठी पद्मश्री, भारत सरकार, २०२२[६]
  • अभियांत्रिकी विज्ञानासाठी TWAS पारितोषिक, TWAS द्वारे, २०१८ द वर्ल्ड ॲकॅडमी ऑफ सायन्सेस २०१८. [७]
  • इंफोसिस पारितोषिक २०१७ अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञान[८]
  • प्रतिष्ठित माजी विद्यार्थी पुरस्कार, IIT खरगपूर, २०१७
  • अभियांत्रिकी विज्ञानातील शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार, २०१०
  • जे. सी. बोस फेलोशिप[९]
  • वरिष्ठ सहयोगी, आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकशास्त्र केंद्र (ICTP), ट्रायस्टे, इटली, २०१३-२०१९.
  • एव्हीएच फाउंडेशन, जर्मनी, २००९-२०१० कडून हम्बोल्ट फेलोशिप.
  • स्वर्णजयंती फेलोशिप, २००६-२००७.
  • फेलो, द वर्ल्ड ॲकॅडमी ऑफ सायन्सेस (TWAS), २०१९.
  • फेलो, इंडियन नॅशनल सायन्स अकादमी (INSA), २०१६.
  • IEEE फेलो, २०१६. [१०]
  • फेलो, इंडियन नॅशनल ॲकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग (INAE), २०२१.
  • फेलो, राष्ट्रीय विज्ञान अकादमी, भारत (NASI), अलाहाबाद, २०१०.

संदर्भ आणि नोंदी

साचा:संदर्भयादी