संध्या (वैदिक)

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:हा लेख

गायत्री देवी

संध्या किंवा संध्यावंदना हा हिंदू धर्मातील ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या त्रिवर्णीयांनी करावयाची एक उपासना आहे.दिवस व रात्र यांच्या संधीकाळात केली जाणारी उपासना म्हणून याला संध्या म्हणतात. या उपासनेची सुरुवात उपनयनानंतर केली जाते. प्रतिदिन प्रातःकाळ, माध्यानकाळ व सायंकाळ अशा तिन्ही काळी ही उपासना केली जाते. ही उपासना आपल्या गुरूकडून शिकून घ्यावी लागते. अर्घ्यदान, गायत्री जप व उपस्थान ही संध्येतील मुख्य कर्मे आहेत. संध्येमध्ये गायत्री देवी, सूर्य, अग्नी, वरूण इ. देवांची उपासना केली जाते.

संध्या उपासनेचे टप्पे

  • भस्मधारण
  • आचमन
  • प्राणायाम
  • संकल्प
  • प्रथम मार्जन
  • मंत्राचमन
  • द्वितीय मार्जन
  • अघमर्षण
  • अर्घ्यदान
  • आसन
  • न्यास
  • गायत्रीध्यान
  • उपस्थान
  • दिग्वंदन
  • प्रदक्षिणा
  • अभिवादन
  • विसर्जन

साधने

  1. आसन पाट
  2. कलश
  3. ताम्हण
  4. पळी
  5. पंचपात्र
  6. पवित्रक


हे सुद्धा बघा

पूजा

बाह्य दुवे