कबीर पंथ
Appearance

कबीर पंथ किंवा सतगुरू कबीर पंथ भारताच्या भक्तीकाळातील कवी संत कबीर यांच्या शिकवणींवर आधारित एक संप्रदाय आहे.[१] कबीरांचे शिष्य धर्मदास यांनी त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे शंभर वर्षांनंतर या पंथाची सुरुवात केली होता. सुरुवातीला वैचारिक आणि नैतिक शिक्षणांवर आधारित हा पंथ कालांतराने धार्मिक संप्रदायात बदलला.[२] कबीर पंथाच्या अनुयायांमध्ये हिंदू, मुसलमान, बौद्ध आणि जैन अशा सर्व धर्मांचे लोक समाविष्ट आहेत.[३] कबीरांच्या रचनांचा संग्रह बीजक या ग्रंथाच्या वैचारिक आणि आध्यात्मिक विचारांचा आधार आहे.[४]
प्रमुख शाखा[संपादन | स्रोत संपादित करा]
भारतातील कबीर पंथाच्या मुख्यतः तीन शाखा मानल्या जातात. काशीची (कबीरचौरा) शाखा, धनौतीची भगताही शाखा आणि छत्तीसगडची शाखा. या शाखांचे संस्थापक अनुक्रमे: श्रृती गोपाल साहेब, भगवान गोसाई आणि मुक्तामनी नाम साहेब यांना मानले जाते.