Jump to content

गुणवंतगड

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट किल्ला

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये पाटण जवळील हा गड मोरगिरीचा किल्ला म्हणून देखील ओळखला जातो.

स्थान[संपादन | स्रोत संपादित करा]

चित्र:रस्ता.jpg
नकाशा

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये असलेल्या पाटण गावाच्या पश्चिम-नैऋत्य(WSW) दिशेला दहा किलोमीटरवर हा गड आहे. पश्चिम-वायव्येला दातगड आहे आणि दोन्ही गडांमधून कोयना नदी आणि हेळवाक-पाटण रस्ता जातो.

इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]

१८ व्या शतकात पेशव्यांच्या राजवटीत या गडाचा उपयोग सैन्यतळ म्हणून केला गेला होता. त्याआधी टेहळणीसाठी या गडाचा उपयोग केला जात असावा. इ.स. १८१८ च्या मराठा युद्धात हा किल्ला ब्रिटिशांकडे सोपवण्यात आला.

गडावरील प्रेक्षणीय स्थळे[संपादन | स्रोत संपादित करा]

सध्या गडावर इतिहासाच्या कोणत्याही खाणाखुणा नाहीत. फक्त एक विहीर आहे.

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:विस्तार-किल्ला

साचा:महाराष्ट्रातील किल्ले