झलकारीबाई (२२ नोव्हेंबर १८३० - १८५८) ही एक स्त्री लढवय्यी होती, जिने १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात एक महत्त्वाची भूमिका बजावली. तिने झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या स्त्री लष्करात काम केले. हिचा जन्म कोळी समाजात झाला.[] पुढे ती झाशीची राणी लक्ष्मीबाईची एक प्रमुख सल्लागार बनली.[] झाशीच्या किल्ल्याचे युद्ध पेटलेले असताना, ती स्वतः राणी म्हणून गादीवर बसली आणि राणीच्या बाजूने आघाडीवर लढली, त्यामुळे राणीला किल्ल्यातून पळून जाणे शक्य झाले.[]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
झलकारीबाईंचा ग्वाल्हेर येथील पुतळा

झलकारीबाई संबंधातील कथा कित्येक शतके बुंदेलखंडातील लोकांच्या स्मरणात आहेत. तिचे आयुष्य, खास करून राणीला वाचवण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीच्या सेनेशी लढतानाचे तिचे धैर्य, याची बुंदेली लोकसाहित्यात आजही स्तुती केली जाते. तिचे शौर्य आणि तिची कोळी ही ओळख यामुळे उत्तर भारतातील शाक्यांमधे स्वाभिमान आणि सांस्कृतिक ऐक्याची भावना निर्माण होण्यास मदत झाली.[]

जीवन संपादन

झाशीजवळ असलेल्या भोजला गावामध्ये २२ नोव्हेंबर १८३० मध्ये सदोबा सिंग आणि जमुना देवी यांच्या पोटी झलकारीबाईंचा जन्म झाला.[] एका खेडेगावातल्या मुलीच्या वाट्याला येतात ती सर्वच कामे झलकारी करत असे. तरी तिच्या लहानपणामध्येच तिने काही अचंबित करणाऱ्या बाबी करून आपल्याकडे इतरांचे लक्ष वेधले होते. स्थानिक लोक गीतांमध्ये झलकारीच्या वीरतेविषयी अनेक उदाहरणे गायली जातात. झलकारीने कमी वयातच वाघाला कुऱ्हाडीने मारल्याची कथा रंगवून सांगितली जाते.[] तसेच झलकारी गायी वळायला गेलेली असताना तिने एका चित्त्याला काठीने मारल्याची कथाही तेव्हढीच प्रसिद्ध आहे.[] राणी लक्ष्मी बाईच्या सैन्यातील तोफखान्याचा काम करणाऱ्या पुरण सिंग नावाच्या सैनिकाशी तिचा विवाह झाला होता. ज्याने झलकारीची ओळख राणी लक्ष्मी बाईशी करून दिली होती. झलकारी लक्ष्मीबाई सारखीच दिसायची आणि ह्यामुळे तिला लक्ष्मीबाईच्या स्त्रियांच्या पलटणीमधे सहभागी करून घेतले गेले.[]

युद्धातील शौर्य संपादन

राणीच्या सैन्यात तिला वेगाने बढती मिळत गेली आणि लवकरच ती स्वतःच्या सैन्याच्या तुकडीचे नेतृत्व करु लागली.[] १८५७ च्या बंडाच्या दरम्यान ह्युज रोज यांच्या नेतृत्वाखालील सैन्याने झाशीवर आक्रमण केले त्या दरम्यान राणी तिच्या किल्ल्यात स्वतःच्या ४००० सैनिकांसह दबा धरुन बसली होती. कल्पी या गावात छावनी टाकून बसलेल्या पेशव्यांचे सैन्य सोडवणूक करेल या अपेक्षेने लक्ष्मीबाई वाट पहात राहिली. परंतु पेशव्यांचे सैन्य येवू शकले नाही, कारण ते जनरल रोज कडून आधीच हारवले होते. दरम्यान झाशीच्या किल्ल्याच्या एका दरवाज्याची सुरक्षा पाहणारा "दुल्हा जू’ याने इंग्रजांशी हातमिळवणी केली आणि झाशीच्या किल्ल्याचा दरवाजा उघडला.जेव्हा ब्रिटीशांचे सैन्य किल्ल्यात शिरले, किल्ल्यात इंग्रजांचे सैन्य झाशीची सैन्य ह्यांमध्ये समोर-समोरचे युद्ध सुरू झाले. ह्या गोंधळाचा फायदा घेत आणि दरबारी व्यक्तींचा सल्ला ऐकत लक्ष्मीबाई मागच्या दरवाज्याने पळून गेली. लक्ष्मीबाईच्या जागेवर झलकारी आली, तिने लक्ष्मीबाईसारखाच पोशाख केलेला होता.[] झलकारीने लक्ष्मीबाईशी असलेल्या तिच्या साधर्म्याचा फायदा घेत स्वतः राणी लक्ष्मीबाई असल्याचे भासवत पूर्ण दिवस लढाई चालू ठेवली.[][१०]

वारसा संपादन

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
झलकारीबाईची प्रतिमा असलेले पोस्टाचे तिकीट

गेल्या काही वर्षात झलकारीबाईच्या प्रतिमेने उत्तर भारतात महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. झलकारीबाईच्या कथेचे सामाजिक-राजकीय महत्त्व मान्य करण्यात आले आहे. झलकारीबाईचा मृत्यूदिन अनेक कोळी संघटना “शहीद दिवस” म्हणून साजरा करतात.[११] बुंदेलखंड या वेगळ्या राज्याची मागणी करणाऱ्या चळवळी देखील झलकारीबाईची कथा बुंदेली अस्मितेच्या निर्मितीसाठी वापरत आहेत.[१२] भारत सरकारच्या डाक-तार विभागाने झलकारीबाईची प्रतिमा असलेले पोस्टाचे तिकिट काढले आहे.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग पंच महल येथे झाशीच्या किल्ल्यात झलकारीबाईच्या स्मरणार्थ एक पाच मजली संग्रहालय बांधत आहे.[१३] बी. एल्. वर्मांच्या १९५१ मध्ये लिहिलेल्या “झांसी की रानी” या कादंबरीत झलकारीबाईचा उल्लेख आहे आणि त्यात तिच्यावर उपकथानक तयार केले आहे. त्यांनी झलकारीबाईचा उल्लेख कोळीण आणि लक्ष्मीबाईच्या सैन्यातील एक सामान्य सैनिक असा केला आहे. राम चंद्र हेरन यांची त्याच वर्षी प्रकाशित झालेली "माटी" ही बुंदेली कादंबरी तिला एक “लढवय्यी आणि शूर शहिद” असे चित्रित करते. झलकारीबाईचे पहिले चरित्र १९६४ मध्ये भवानी शंकर विशारद यांनी, वर्मांची कादंबरी आणि झाशीच्या आसपासच्या कोळी समाजाच्या मौखिक कथांवर संशोधन करून लिहिले.[१४]

झलकारीबाईची कथा सांगणाऱ्या कथालेखकांनी झलकारीबाईला लक्ष्मीबाईच्या पातळीवर आणून पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.[१४] १९९० च्या दशकापासून झलकारीबाईच्या कथेने कोळी स्त्रीत्वाच्या उग्र स्वरूपाच्या आदर्श उभा करण्यास सुरुवात केली. ज्याला राजकीय परिमाण मिळाले आणि तिच्या प्रतिमेची सामाजिक परिस्थितीतून येणाऱ्या गरजेप्रमाणे पुनर्निर्मिती सुरू झाली.[१२] राष्ट्र्पती रामनाथ कोविंद यांनी १० नोव्हेंबर २०१७ रोजी भोपाळ मधील गुरू तेग बहादुर संकुलामध्ये झलकारीबाईच्या पुतळ्याचे अनावरण केले.[१५]

संदर्भ संपादन

  1. साचा:स्रोत पुस्तक
  2. २.० २.१ साचा:Harvnb
  3. ३.० ३.१ Varma, B. L. (1951), Jhansi Ki Rani, p. 255, as quoted in साचा:Harvnb
  4. साचा:Harvtxt प्रमाणे "आज, कोळी इतर दलित जातींप्रमाणे, झलकारीबाईचे मिथक स्वतःच्या समाजाचा गौरव करण्यासाठी वापरतात. ते दरवर्षी “झलकारीबाई जयंती सुद्धा साजरी करतात जेणेकरून त्यांचा आत्मसन्मान आणि त्यांच्या जातीचे स्थान वर जावे. ती एक कोळी समाजातील “दलित वीरांगना” होती आणि हि एक अभिमानास्पद बाब आहे आणि ते तिच्या पराक्रमाचे वर्णन करताना ही बाजू अधोरेखित करतात."
  5. साचा:स्रोत पुस्तक
  6. साचा:संकेतस्थळ स्रोत
  7. साचा:स्रोत पुस्तक
  8. साचा:स्रोत पुस्तक
  9. साचा:जर्नल स्रोत
  10. साचा:स्रोत पुस्तक
  11. साचा:Harvnb
  12. १२.० १२.१ साचा:Harvnb
  13. साचा:स्रोत बातमी
  14. १४.० १४.१ साचा:Harvnb
  15. साचा:स्रोत बातमी