Jump to content

दिशा पिंकी शेख

मराठीपिडिया कडून

दिशा पिंकी शेख ( ७ मे १९८४) ह्या महाराष्ट्रातील तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या, कवयित्री आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या आहेत.[] त्या वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्यासाठीच्या प्रवक्ते गटाच्या सदस्याही आहेत.[] त्यांची ओळख सामाजिक चळवळीतील एक तृतीयपंथी कार्यकर्त्या आणि कवयित्री म्हणून असल्याचे त्या सांगतात.[][]

वैयक्तिक जीवन[संपादन | स्रोत संपादित करा]

मुळच्या नाशिक जवळच्या येवले येथील असलेल्या दिशा शेख यांचे शालेय शिक्षण दहावीपर्यंतच झाले आहे.[] त्या पुस्तकविक्री, मंगती (हिजडा म्हणून भीक मागणे) इत्यादी करून उपजीविका करतात.[] दिशा शेख ह्या बाबासाहेब आंबेडकर यांना आपले मुख्य आदर्श मानतात. "बाबासाहेबांमुळे आम्हाला [तृतीयपंथीयांना] व्यक्ती म्हणून मान्यता मिळाली" असे त्या सांगतात.[]

राजकीय कारकीर्द[संपादन | स्रोत संपादित करा]

दिशा शेख ह्या भारिप बहुजन महासंघ या राजकीय पक्षाशी संलग्न असून फेब्रुवारी २०१९ मध्ये जाहीर झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्ते गटामध्ये त्यांचा सहभाग केला आहे.[] राजकीय पक्षाच्या प्रवक्ते पदी निवड होणाऱ्या त्या महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी आहेत.[]

या पदाची जबाबदारी स्वीकारताना त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच राजकीय जबाबदारी स्वीकारत असल्याने दडपण आल्याचे नोंदवले आहे. त्याचबरोबर लैंगिक अल्पसंख्याकांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.[] लैंगिक अल्पसंख्याकांचा आवाज संसदेत पोहोचवणे ही जबाबदारी स्वीकारण्याचा हेतू आहे असे त्यांनी मत व्यक्त केले.[] सर्व वंचितांच्या प्रश्नांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याचेही त्यांनी नोंदवले आहे.[१०]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी