Jump to content

पंढरपूर रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानकपंढरपूर रेल्वे स्थानक हे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुका आणि इतर जवळच्या गावांना सेवा देणारे रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक भारतीय रेल्वेच्या मध्य झोनमधील सोलापूर रेल्वे विभागांतर्गत येते.[]

विठ्ठलाचे तीर्थक्षेत्र असल्याने हे स्थानक नेहमी व्यस्त असते. पंढरपूरच्या वाऱ्यांसाठीही अनेक विशेष गाड्या सुरू कराव्या लागतात.[] मुंबई आणि पंढरपूर जोडणारी पंढरपूर- दादर एक्स्प्रेस ही गाडी पर्यटकांची संख्या लक्षात घेऊनच सुरू करण्यात आली होती. इतर अनेक महत्त्वाच्या गाड्यांनी हे स्थानक पंढरपूरला महाराष्ट्र आणि देशाच्या इतर भागांशी जोडते.[][]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
स्थानकाचा साइनबोर्ड

इमारत[संपादन | स्रोत संपादित करा]

मंदिराच्या शैलीत स्थानकाचे प्रवेशद्वार तयार केले आहे. तसेच स्थानकाच्या समोर एक छोटी बाग आहे. या बागेत ब्रिटिशकालीन रेल्वेचे इंजिन पर्यटकांना पाहण्यासाठी ठेवले आहे. हे इंजिन पर्यटकांना नेहमी आकर्षित करते.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
रेल्वे स्थानकाच्या समोर हे ब्रिटिशकालीन रेल्वे इंजिन ठेवले आहे.

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी