यदुनाथ दत्तात्रय थत्ते
Appearance
यदुनाथ दत्तात्रय थत्ते (जन्म : ५ आॅक्टोबर १९२२; - १० मे १९९८) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, एक उत्कृष्ट लेखक व संपादक आणि मराठी साहित्यिक होते. साने गुरुजी यांचा त्याच्यावर प्रभाव होता. ते 'साधना साप्ताहिका'चे संपादक होते.[१]
जीवन[संपादन | स्रोत संपादित करा]
नाशिक जिल्ह्यातील येवला येथे जन्मलेल्या थत्ते यांना १९४२ साली 'भारत छोडो' आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल सहा महिने कारावास ठोठावण्यात आला होता.
साहित्य[संपादन | स्रोत संपादित करा]
यदुनाथ दत्तात्रय थत्ते यांनी विपुल साहित्य लिहिले. कादंबऱ्या, लेख, निबंध, काव्य, चरित्रे इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांनी लिहिलेली पुस्तके :-
- आटपाटनगर होते (बालकादंबरी)
- आपला वारसा (चरित्रसंग्रह)
- चिरंतन प्रकाश देणारी ज्योत महात्मा गांधी (व्यक्तिचित्रण-बालसाहित्य)
- पुढे व्हा (भाग १ ते ३, माहितीपर)
- भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर (चरित्र)
- यशाची वाटचाल (माहितीपर)
- रेशमा (बालसाहित्य)
- समर्थ व्हा,संपन्न व्हा (उपदेशपर)
- साने गुरुजी (चरित्र)
- साने गुरुजी : जीवन-परिचय (व्यक्तिचित्रण)
- स्वातंत्र्यगीते (संपादित)
संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:विकिस्रोत साहित्यिक साचा:विस्तार