Jump to content

राजिंदर गोयल

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती राजिंदर गोयल (२० सप्टेंबर, १९४२ - जून २१, २०२०) एक भारतीय क्रिकेटपटू होते. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. असे असूनही प्रथम श्रेणी स्पर्धेत भारत संघात त्यांची निवड झाली नाही.[][] डावखुरे फिरकीपटू म्हणून त्यांनी पतियाळा संघाचे प्रतिनिधित्व केले. दक्षिण पंजाब, दिल्ली आणि हरियाणा या देशांतर्गत क्रिकेटमध्ये ते खेळले आहेत.

भारतीय रेल्वेत सहायक स्टेशन मास्तरचा मुलगा असलेले गोयल यांचे शिक्षण वैश शाळेत, तर महाविद्यालयीन शिक्षण रोहतक येथे झाले. त्यांनी १९५७ मध्ये उत्तर-विभागीय शालेय स्पर्धेत त्यांनी यशस्वी कामगिरी केली. पश्चिम विभागाविरुद्धच्या अखिल भारतीय शालेय स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्यांनी चार गडी बाद केले आणि स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून बहुमान मिळवला. पुढच्या सत्रात त्यांनी रणजीमध्ये पदार्पण केले. गोयल यांनी आपल्या सुरुवातीच्या यशाचे श्रेय शिक्षक व प्रशिक्षक किशन दयाल यांना दिले आहे. त्यांनी प्रथम श्रेणी कारकिर्दीची सुरुवात पतियाळापासून केली, जो नंतर दक्षिण पंजाब संघात विलीन झाला. ते १९६३ मध्ये दिल्लीत आणि दहा वर्षांनंतर हरियाणा स्थायिक झाले.

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी