ललिता पंचमी
Appearance

साचा:भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका दिवस ललिता पंचमी ही शारदीय नवरात्र उत्सवातील महत्त्वाचा दिवस मानली गेलेली तिथी आहे.[१] आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला ललिता पंचमी म्हटले जाते.[२]
व्रताचे स्वरूप[संपादन | स्रोत संपादित करा]
या दिवशी नवरात्र उत्सवानिमित्त देवीच्या उपांग ललिता या रुपाची पूजा केली जाते.[३] करंडा या भांडे प्रकारावरील केवळ झाकणाची प्रतीकरूप पूजा या दिवशी केली जाते. ललिता देवीला दूर्वांचा हार अर्पण केला जातो. देवीच्या नैवेद्याला खीर, लाडू,घारगे तयार करतात. भोपळ्याच्या घारग्याचे वन देण्याची पद्धतीही दिसून येते. रात्री जागरण आणि देवीच्या कथेचे श्रवण केले जाते. दुस-या दिवशी सकाळी व्रताचे उद्यापन केले जाते. हे व्रत स्त्री आणि पुरुष दोघेही करतात.[४]