२०१६-१७ रणजी करंडक
साचा:Infobox cricket tournament २०१६-१७ रणजी करंडक ही भारतातील एक मुख्य प्रथम श्रेणी स्पर्धा रणजी करंडक स्पर्धेची ८३ आवृत्ती होती. मागील हंगामांपेक्षा वेगळ्या पद्धतीने २०१६-१७ची स्पर्धा ही तटस्थ ठिकाणांवर खेळवली गेली.[१][२][३] कर्णधार आणि प्रशिक्षकांनी ह्या बदलास पाठिंबा दिला.[४] सदर स्पर्धेत पदार्पण करणारा छत्तीसगड क्रिकेट संघ हा रणजी करंडक स्पर्धेत भाग घेणारा २८वा संघ होता.[५][६] मुंबईचा संघ हा गतविजेता होता.[७] अंतिम सामन्यात गुजरातने मुंबईला ५ गडी राखून पराभूत करत पहिल्यांदाच विजेतेपद मिळवले.[८]
सप्टेंबर २०१६ मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्पर्धेच्या तारखा, गट आणि वेळापत्रक जाहीर केले.[९] दिवस/रात्र कसोटी क्रिकेट खेळवण्यासंदर्भात निर्णय घेण्यास मदत व्हावी ह्या हेतूने स्पर्धेत यावेळी गुलाबी चेंडू वापरण्यात आला.[१०]
ऑक्टोबर २०१६ मध्ये, गट बच्या महाराष्ट्र आणि दिल्ली दरम्यानच्या सामन्यात, महाराष्ट्रातर्फे खेळताना स्वप्निल गुगले आणि अंकित बावने यांनी रणजी स्पर्धेत ५९४ धावांची विक्रमी भागीदारी केली. प्रथम-श्रेणी क्रिकेट मधील ही दुसरी सर्वोत्तम भागीदारी होती.[११]
गट अ मधील गुजरात विरुद्ध बंगाल आणि गट क मधील हैदराबाद विरुद्ध त्रिपुरा हे सामने धुरक्यामुळे रद्द करण्यात आले.[१२] बीसीसीआयने सुरुवातीला, गट फेरी संपल्यानंतर ह्या सामन्यांचे आयोजन केले होते.[१२] ह्या सामन्यांना तारखा उपलब्ध करून देण्यासाठी, बाद फेरीतील सामने पुढे ढकलण्यात आले होते.[१२] मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आणि तमिळनाडू क्रिकेट असोसिएशन (टीएनसीए) या दोघांनी वेळापत्रकात बदल करण्यास विरोध केला.[१३] एमसीएचे सह-सचिव उन्मेश खानविलकर म्हणाले की "ह्यामुळे बाद फेरीसाठी पात्र होण्यास सहभागी संघांना अयोग्य असा फायदा मिळेल".[१३] टीएनसीएचे सचिव कासी विश्वनाथन, ह्यांनी म्हटले "सामन्यांच्या तारखा बदलू नयेत आणि गुण विभागून देण्यात यावेत ".[१३] ह्या नंतर बीसीसीआयने सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार केला.[१४] डिसेंबर २०१६ मध्ये, बदलांचा निर्णय रद्द करण्यात आला आणि रद्द झालेल्या सामन्यांसाठी प्रत्येक संघाला प्रत्येकी १ गुण देण्यात आला.[१५]
अ गटातून मुंबई, गुजरात आणि तमिळनाडू, ब गटातून झारखंड, कर्नाटक आणि ओरिसा आणि क गटातून हैदराबाद आणि हरयाणा हे संघ स्पर्धेच्या बाद फेरीसाठी पात्र होऊ शकले[१६][१७][१८][१९] उपांत्यपूर्व फेरीच्या तारखा एका दिवसाने आणि उपांत्य सामन्यांच्या तारखा दोन दिवसाने मागे गेल्या.[२०] इंदूरमधील होळकर मैदानावर अंतिम सामना आधी ठरल्यापेक्षा दोन दिवस अगोदार १० जानेवारी २०१६ रोजी खेळवण्यात आला.[२०]
उपांत्य सामन्यात गुजरातने झारखंडला १२३ धावांनी पराभूत करून रणजी करंडक इतिहासात १९५०-५१ नंतर दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश केला.[२१] दुसरीकडे मुंबईने तमिळनाडूला ६ गडी राखून पराभूत करून ४६व्यांदा रणजी करंडक अंतिम सामन्यात धडक मारली.[२२]
संघ संपादन
संघ खालील प्रमाणे तीन गटांमध्ये विभागले गेले:[९]
साचा:Col-begin साचा:Col-3 गट अ
साचा:Col-3 गट ब
साचा:Col-3 गट क
गुणफलक संपादन
गट अ संपादन
साचा:रणजी करंडक, २०१६-१७ अ-गट गुणफलक
गट ब संपादन
साचा:रणजी करंडक, २०१६-१७ ब-गट गुणफलक
गट क संपादन
निकाल संपादन
गट अ संपादन
साचा:रणजी करंडक, २०१६-१७ अ-गट सामने
गट ब संपादन
साचा:रणजी करंडक, २०१६-१७ ब-गट सामने
गट क संपादन
साचा:रणजी करंडक, २०१६-१७ क-गट सामने
बाद फेरी संपादन
उपांत्यपूर्व सामने संपादन
उपांत्य सामने संपादन
अंतिम सामना संपादन
संदर्भ आणि नोंदी संपादन
बाह्यदुवे संपादन
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ ९.० ९.१ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ १२.० १२.१ १२.२ साचा:स्रोत बातमी
- ↑ १३.० १३.१ १३.२ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ २०.० २०.१ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी