ब्रेट ली

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १७:५६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती

ब्रेट ली (नोव्हेंबर ८, इ.स. १९७६) हा एक माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे. लीला जगातील सर्वात जलद गोलंदाजापैकी एक मानले जाते. पदार्पणा नंतर सातत्याने २ वर्ष त्याने गोलंदाजी सरासरी २० चेंडू पेक्षा कमी ठेवली.[१]

ली उत्तम क्षेत्ररक्षक तसेच चांगला लोवर ऑर्डर फलंदाज आहे. कसोटी सामन्यांमध्ये त्याची फलंदाजी सरासरी २० पेक्षा जास्त आहे. मायकल हसी सोबत १२३ धावांची सातव्या गड्यासाठी त्याची ऑस्ट्रेलियन संघासाठी विकमी भागीदारी आहे.[२]

लीचे उपाख्य 'बिंगा', न्यू साउथ वेल्स मधील बिंग ली ह्या इलेक्ट्रॉनिक वस्तुच्या दुकानांवरून पडले.

ब्रेट ली कोलकाता नाइट रायडर्स संघासाठी आयपीएल मध्ये खेळतो.[३]

१३ जुलै, २०१२ रोजी ऑस्ट्रेलियन संघाच्या इंग्लंड दौऱ्या दरम्यान झालेल्या दुखापती नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधुन संन्यास घेण्याचे घोषित केले. ली आयपीएल तसेच बिग बॅश लीग खेळत राहील. [४]

गोलंदाजी पद्धती

ली जलदगती गोलंदाजी साठी जाणल्या जातो व तो नियमित पणे १५० किमी/ता किंवा अधिक गोलंदाजी करतो. पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तर (१६१.३ किमी/ता, १००.२ मा/ता) नंतर जलदगती गोलंदाजीत ब्रेट लीचा नंबर आहे.[५] सातत्याने जलद गोलंदाजी केल्याने त्याला अनेक दुखापतींना सामोर जावे लागल. दुखापतीं पासुन दुर राहण्यासाठी त्याने आपली गोलंदाजी पद्धती बदलली.[६].

कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात लीची गोलंदाजी एक्शन चुकीची(क्रिकेट नियमांनुसार) असल्याचे म्हणले जायचे.[७] तसेच अनेक बीमर चेंडू एकदिवसीय सामन्यात टाकल्या नंतर बराच गदारोळ झाला होता.[८][९]

साचा:संदर्भनोंदी साचा:३०० कसोटी बळी साचा:ऑस्ट्रेलिया संघ - क्रिकेट विश्वचषक, २००३ साचा:ऑस्ट्रेलिया संघ - क्रिकेट विश्वचषक, २००७ साचा:ऑस्ट्रेलिया संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११ साचा:कोलकाता नाइट रायडर्स संघ