वारकरी संगीत संमेलन
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १४:४७, ३१ ऑगस्ट २०२०चे आवर्तन
संगीतोन्मेष संस्थेतर्फे अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलन भरवले जाते.
- १ले वारकरी संगीत संमेलन २१ ते २३ नोव्हेंबर २००३ दरम्यान पुण्यात शनिवारवाड्यासमोर झाले होते. संमेलनाध्यक्ष किराणा घराण्याचे गायक पंडित यादवराज फड होते.
- २रे वारकरी संगीत संमेलन २४ ते २६ नोवेम्बर २००४ या काळात पंढरपूर येथे झाले होते.
- ६वे संमेलन पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृह येथे ७-८ डिसेंबर २०१० या दिवशी झाले. बद्रिनाथ महाराज तनपुरे हे या संमेलनाचे अध्यक्ष होते.
- ७वे संमेलन २०१३साली १ ते ३ मार्च या दरम्यात, पुणे शहरात शनिवारवाड्यासमोरच्या पटांगणात झाले. संमेलनाध्यक्ष पंडित यादवराज फड होते.
- भारतीय संगीत कलापीठ हे वारकरी संगीत परीक्षा अभ्यासक्रम राबविणारे सर्वप्रथम व एकमेव कलापीठ आहे. [१]
पहा : साहित्य संमेलने