वारकरी संगीत संमेलन

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

संगीतोन्मेष संस्थेतर्फे अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलन भरवले जाते.

  • १ले वारकरी संगीत संमेलन २१ ते २३ नोव्हेंबर २००३ दरम्यान पुण्यात शनिवारवाड्यासमोर झाले होते. संमेलनाध्यक्ष किराणा घराण्याचे गायक पंडित यादवराज फड होते.
  • २रे वारकरी संगीत संमेलन २४ ते २६ नोवेम्बर २००४ या काळात पंढरपूर येथे झाले होते.
  • ६वे संमेलन पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृह येथे ७-८ डिसेंबर २०१० या दिवशी झाले. बद्रिनाथ महाराज तनपुरे हे या संमेलनाचे अध्यक्ष होते.
  • ७वे संमेलन २०१३साली १ ते ३ मार्च या दरम्यात, पुणे शहरात शनिवारवाड्यासमोरच्या पटांगणात झाले. संमेलनाध्यक्ष पंडित यादवराज फड होते.
  • भारतीय संगीत कलापीठ हे वारकरी संगीत परीक्षा अभ्यासक्रम राबविणारे सर्वप्रथम व एकमेव कलापीठ आहे. [१]


पहा : साहित्य संमेलने