Jump to content

लुधियाना

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १२:३३, ३ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट शहर लुधियाना (पंजाबी: ਲੁਧਿਆਣਾ) हे भारताच्या पंजाब राज्यामधील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. लुधियाना शहर पंजाबच्या पूर्व भागात सतलज नदीच्या जुन्या काठावर राजधानी चंदिगढच्या ९८ किमी पश्चिमेस वसले आहे. लुधियाना दिल्लीच्या उत्तरेकडील भारताचे सर्वात मोठे शहर असून ते उत्तर भारतातील एक प्रमुख औद्योगिक केंद्र मानले जाते. जागतिक बँकेनुसार २००९ व २०१३ साली वाणिज्य व व्यापारासाठी लुधियाना भारतातील सर्वोत्तम शहर होते. २०११ साली लुधियानाची लोकसंख्या १६.१९ लाख होती.

नवी दिल्ली ते अमृतसर दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग १ लुधियानामधून जातो. तसेच लुधियाना रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेचे एक वर्दळीचे जंक्शन आहे.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:कॉमन्स वर्ग

साचा:पंजाब - जिल्हे