Jump to content

यशवंतगड

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:००, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र

यशवंतगड हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण कोकणातल्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातले एक गाव / किल्ला आहे.

भौगोलिक स्थान[संपादन | स्रोत संपादित करा]

हा किल्ला राजापूर तालुlक्यातील नाटे (साखरी नाटे)' या गावाजवळ आहे. हे गाव रत्‍नागिरीपासून ५१ किलोमीटरवर व राजापूरपासून ३० किमी अंतरावर आहे.

रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात दोन किनारी दुर्ग आहेत, ते म्हणजे आंबोळगड व यशवंतगड. मुसाकाजी या प्राचीन बंदरावर तसेच समुद्रावर नजर ठेवण्यासाठी यशवंतगड बांधण्यात आला. इ.स. १८१८ मध्ये इंग्रजी सेनेतील कर्नल इमलॉक याने किल्ला जिंकला.

हवामान[संपादन | स्रोत संपादित करा]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

गडावरील राहायची व खाण्याची सोय[संपादन | स्रोत संपादित करा]

गडालगत भरपूर हाॅटेले, रिसाॅर्ट्‌स आदी निवासाची थिकाणे व रेस्टॉरंटे, घरगुती जेवण आदीची सोय आहे.

प्रेक्षणीय स्थळे[संपादन | स्रोत संपादित करा]

कसे जाल ?[संपादन | स्रोत संपादित करा]

रत्‍नागिरीहून आडीवरे- नाटे -आंबोळगड यामार्गे अथवा राजापूर-नाटे-आंबोळगड यामार्गे गडावर जाता येते.

जवळपासची गावे[संपादन | स्रोत संपादित करा]

नाटे

साखरी नाटे

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/

पहा : महाराष्ट्रातील किल्ले