Jump to content

भांबेड

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:५५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

भांबेड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील गाव आहे.

भौगोलिक स्थान[संपादन | स्रोत संपादित करा]

लांजा बस स्थानकापासून गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर उजवीकडे फुटणाऱ्या वेरवली-कोर्ले रस्त्याने गेल्यानंतर कोर्ले तिठ्यावर उजवीकडे गेल्यावर हे गाव लागते. लांज्यापासून हे २१ किमी अंतरावर वसलेले आहे.

हवामान[संपादन | स्रोत संपादित करा]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो. कातळाची जमीन असल्यामुळे पाणी साचत नाही. उन्हाळ्यात उष्ण तर हिवाळ्यात सुखद गार हवामान असते.

लोकजीवन[संपादन | स्रोत संपादित करा]

येथे मुख्यतः कुणबी, वैश्य, ब्राह्मण, मुस्लिम समाजातील लोक पूर्वीपासून स्थायिक आहेत. आठवड्यात एक दिवस येथे बाजार भरतो.भांबेड, हर्दखळे, कोर्ले,प्रभानवल्ली ह्या गावातील लोक बाजारात खरेदी-विक्रीसाठी येतात.नागली,भातशेती बरोबरच दुग्धव्यवसाय, बकरीपालन,काथउत्पादन व्यवसाय केले जातात.

नागरी सुविधा[संपादन | स्रोत संपादित करा]

येथे येण्यासाठी लांजा एसटीबस स्थानकातून भांबेड, हर्दखळे बसेस नियमित सोडल्या जातात.लांज्यावरून खासगी रिक्षासुद्धा उपलब्ध असतात. सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्तेवीजपुरवठा भांबेड ग्रामपंचायतीतर्फे पाहिले जाते.येथे सहकारी बँकेची सुविधा उपलब्ध आहे.