Jump to content

साळेगाव हडप

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १२:०८, ३ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साळेगाव हडप

स्थान[संपादन | स्रोत संपादित करा]

साळेगाव हडप हे गाव महाराष्ट्र राज्यातल्या जालना जिल्ह्यातील जालना या तालुक्यात आहे. हे गाव जालना - मंठा रस्त्यावर साळेगाव पाटी पासून ३ km अंतरावर वसलेले आहे. औरंगाबाद व "जालना येथे जवळचे रेल्वे स्टेशन आहे.

लोकजीवन[संपादन | स्रोत संपादित करा]

गावात प्रामुख्याने हिंदू व बौद्ध धर्मीय आहेत. गावातील 80 टक्के लोकसंख्या ही मराठा जातीची आहे.बहुतांश लोकसंख्या गंगातीवरे,म्हस्के,खरात,नाईकनवरे,घारे,गुळमकर,शिंदे,डिखुळे, आरेकर हे आडनाव असलेली आहे.

प्रशासन[संपादन | स्रोत संपादित करा]

इथला कारभार हा ग्रामपंचायतीमार्फत चालतो. हे गाव कदीम जालना पोलीस स्टेशनाच्या हद्दीत येते. तहसील कार्यालय जालना येथे आहे.

शिक्षण[संपादन | स्रोत संपादित करा]

गावात प्राथमिक व माध्यमिक व्यवस्था आहे. पुढील शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते.

आरोग्य[संपादन | स्रोत संपादित करा]

गावात महाराष्ट्र शासनाचे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. तसेच खाजगी इस्पितळही आहे.

व्यवसाय[संपादन | स्रोत संपादित करा]

येथील जनजीवन हे शेती व्यवसायावर अवलंबून आहे. काही लोक इतर व्यवसाय करतात. येथे जालना जिल्हा मध्यवर्ती बँक व महाराष्ट्र गोदावरी ग्रामीण बँक या बँका रामनगर येथे आहेत.