जालना

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:जिल्हा शहर साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र

जालना हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्यातले शहर आहे. जालना शहर हे मराठवाड्यातील जालना जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. जालना शहराचे पूर्वीचे नाव जानकीपुर होते.

इतिहास

जालना शहरातील किल्ला काही काळ महाराजा यशवंतराव होळकर यांच्या अधिपत्याखाली होता तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जालना शहरातील पलंग बारवेचा जिर्णोद्धार करून इंदेवाडीजवळ एक शिवलिंग आकाराची बारव निर्माण केली. तिचा उपयोग पालखीसाठी होत होता तर होळकर सरकारच्या काळात हरिरिसाला अर्थात हत्तीवरून रंगपंचमीच्या दिवशी रंग उधळण्याची परंपरा सुरू करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेवटची लुट जालना येथे केली असुन जालना शहर हे प्रगतशील शहर होते शहरात अमृतेश्वर मंदिर, बारव असुन आजही सुस्थितीत आहे. आनंदी स्वामी मंदिर, दत्त मंदिर पहायला मिळतात तसेच अनेक मस्जिद, दर्गा, वेशी ही जालना शहराचे आकर्षण आहे.

मराठीतील महानुभाव पंथाच्या आद्य कवयित्री महदंबा या अंबड तालुक्यातील रामसगावच्या आहेत, असे सांगितले जाते. मात्र, जालना येथे झाले्ल्या ६व्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनात महदंबेच्या जन्मस्थळावरून वाद झाले. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले यांनी महदंबा जालना जिल्ह्यातील नव्हे, तर औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील असल्याचे सांगितले, तर संमेलनानिमित्त काढलेल्या ममानिनीफ या स्मरणिकेतील लेखात प्रा. डॉ. सुधाकर जाधव यांनी महदंबेचा जन्म पुरी (पांढरी, तालुका गेवराई, जिल्हा बीड) गावातील असल्याचा उल्लेख केला.रोहिलागड हे ऐतिहासिक गाव जालना जिल्ह्यात येते. हंबीरराव मोहिते उर्फ चव्हाण घराणे ता. जि. जालना येथील मंहमंदाबाद (पिंपळगाव) येथे राहते. त्यांचे 5 वाडे असुन 3 भव्य वास्तु व मोठी गढी आहे व तसेच बुरूजाजवळच निळकंठराव मोहिते-चव्हाण (हंबीरराव) यांची समाधी आहे.

भूगोल

१. जालना येथे मोसंब्यांची मोठी बाजारपेठ आहे. तसेच परतूर एक महत्त्वाचा तालुका आहे येथे भक्त प्रल्हाद काही काळ वास्तव्यास होते परतूरचे जुने नाव प्रल्हादपूर असे होते.

२. रोहिलागड हे मोठा बाजारपेठेचे गाव आहे.

३. जालना हे बी-बियाणे उद्योगच्या नावाने ओळखले जाते.

४. जालना जिल्यात एकूण आठ तालुके आहेत.

५. जालना जिल्ह्यातील राजुर हे गाव तिर्थक्षेत्र म्हणून आहे. तिथे गणपती मंदिर आहे.

६. जालना शहरातुन कुंडलिका नदी जाते.

७. जालना जिल्ह्यातुन जाणारी गोदावरी नदी जिल्ह्यातील अनेक गावांची तहान भागविते.

८. जालना जिल्ह्यातील जांब हे गाव संत रामदास स्वामी यांचे जन्मगाव आहे. येथे श्रीमंत इंदिराबाई होळकर यांनी अन्नछत्र सुरू केलेले असुन त्यांचा शिलालेख तेथे पहायला मिळतो तर अहिल्यादेवी होळकर यांनी गावात बारव निर्माण केलेली आहे.

९. आसई युद्ध, अंबडचे मराठा इंंग्रज युद्ध

वाहतूक व्यवस्था

जालना रेल्वे स्थानक हे दक्षिण मध्य रेल्वेच्या मनमाड-सिकंदराबाद मार्गावर आहे. जालन्याहून भारताच्या अनेक प्रमुख शहरांसाठी थेट प्रवासी रेल्वे सेवा उपलब्ध आहे.[१] मुंबईहून औरंगाबादपर्यंत धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस ऑगस्ट २०१५ मध्ये जालन्यापर्यंत वाढवण्यात आली. ह्याव्यतिरिक्त तपोवन एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस. नंदीग्राम एक्सप्रेस, अजिंठा एक्सप्रेस इत्यादी गाड्या जालन्याहून रोज धावतात.

महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेला नागपूरऔरंगाबादमुंबई द्रुतगती मार्ग जालन्यामधूनच जाईल असा अंदाज आहे. शासनाने जालना-खामगाव लोहमार्गालाही मंजुरी दिली आहे. औरंगाबाद ते जालना अंतर जवळपास 75 कि.मी. आहे.

देवळे

१. जालना शहरापासून ४६ कि.मी. अंतरावर शंभू महादेवाचे एक जागरूक देवस्थान आहे. तेथून जवळच वटेश्वर महाराज मंदिर आहे; तेथे महाशिवरात्रीनिमित्त जत्रा भरते.
२. येथून २५ कि.मी. वर राजूर गणपती हे देवस्थान आहे

३. जालना शहरापासून १५ कि.मी. अंतरावर देऊळगाव राजा रोडवर वाघरूळ देवीचे मंदिर आहे.

४. जालना पासून १० कि.मी. अंतरावर सिंदखेड राजा रोड वर माळाचा गणपती तसेच त्याच रस्त्यावर अलीकडे जालना बसस्थानकापासून अंदाजे ५ कि.मी. अंतरावर प्रसिद्ध दत्ताश्रम आहे जेथे वर्षभर काही न काही अध्यात्मिक कार्यक्रम होत असतात.

५.जालन्यापासून ४४ कि.मी. अंतरावर अंबड पासून १७ कि.मी. वर जांबुवंतगड, जामखेड ता. अंबड येथे रामायण काळातले व हनुमानानंतर श्रीरामांचे निस्सीम भक्त श्री जांबुवंत महाराजांचे मंदिर आहे.

६. तसेच त्या शेजारी रोहिलागड ता. अंबड या ऐतिहासिक गावी येथे अनेक प्राचीन मंदिर व अनेक शिलालेख आहेत.

७. जालना जिल्ह्यामध्ये अंबड येथे मत्सोदरी देवीचे मंदिर आहे. प्रती वर्षी नवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते येथे एक शिलालेख आढळतो तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार करीत अडीचशे एकर जमीन इनाम दिलेली आहे अंबड हे होळकरांचे खाजगी वतन होते. यावर अरुणचंद्र पाठक यांनी होळकरकालीन अंबड हे पुस्तक लिहलेले आहे.

८. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वनारशी हे ग्रामीण देवस्थान आहे. तिथे अंबड, घनसावंगी, जालना या तालुक्यातील भक्त येतात.

९. पाथरवाला गावची ऐतिहासिक अशी नोंद पुरातत्त्व खात्याकडे असुन यादवाचा सेनापती खोलेश्वरच्या नावाने खोलेश्वर महादेव मंदिर तसेच पार्थ मंदिर आहे. याच गावचे विद्यमान पालकमंत्री राजेश अकुंशराव टोपे हे भूमीपुत्र आहेत.

१०. डोनगाव येथे बोहरी समाजाचा जागतिक स्तरावरील दर्गा आहे.

११. जामखेड येथे कोरीव मुर्तीकाम असलेले खडकेश्वर महादेव मंदिर आहे.

१२. भारतातील एकमेव जांबुवंत मंदिर जामखेड येथे आहे श्रीकृष्ण जांबुवंत यूद्धभूमी म्हणून जामखेडला लौकिक आहे.

१३. चिचंखेड येथे खंडोबा तसेच शिवमंदिर असून सातवाहन काळातील व्यापारी मार्ग असलेले हे गाव आहे. गावात मातीची एका ताम्रपटातुन गावातील समाजजीवनाची माहिती मिळते

संस्कृती

रंगभूमी

चित्रपट

रत्नदिप सीनेमा घर निलम चित्रपटगृह

खवय्येगिरी

प्रसारमाध्यमे

पुढारी, लोकमत, सकाळ इत्यादी वृत्तपत्रे

शिक्षण

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मत्स्योधरी शिक्षण संस्थेमुळे शिक्षणाच्या सोयी उपलब्ध झाल्या आहेत.

जिल्ह्यातील सर्व भागात शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. जालना जिल्ह्यातील विद्यार्थी सर्व सामान्य बी.ए, बी.एस्सी, बी.कॉम हे करताना आढळतात. जिल्ह्यात पॉलिटेक्निकल करणारे विद्यार्थी आहेत. अनेक विद्यार्थी मेडिकल क्षेत्रात आहे. जिल्ह्यातील मत्स्योदरी शिक्षण संस्था, अंबड, घनसावंगी, परतुर, जालना तालुक्यात आहे.

विशेष शिक्षण

  • शासकीय तंत्रनिकेतन, जालना
  • जे. ई. एस. कॉलेज, जालना.
  • बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना.
  • राष्ट्रमाता इदिरा गांधी महाविद्यालय, जालना
  • मत्स्योधरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जालना
  • शासकीय तंत्रनिकेतन अंबड
  • जांबुवंत विद्यालय रोहिलागड
  • INSTITUTE OF CHEMICAL TECHNOLOGY, Marathwada Campus, Jalna

संशोधन संस्था

बारवाले संशोधन संस्था जालना औद्योगिक वसाहत येथे आहे. तसेच जालना जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या बदनापूर तालुकयामध्ये मोसंबी संशोधन केंद्र तसेच कडधान्य संशोधन केंद्र आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर इतिहास, संस्कृती, कला संशोधन, वारसा जतन व ग्रंथ, वस्तू संग्रहालय अंबड या संस्थेच्या माध्यमातून इतिहास संशोधक रामभाऊ लांडे जालना जिल्ह्यातील अज्ञात इतिहासावर संशोधन करीत असुन ते मत्स्योदरी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर येथील अध्यासन समितीचे सदस्य आहेत. त्यांनी अनेक शोधनिबंध सादर केलेले असुन मराठा कालखंडातील ऐतिहासिक माहिती संदर्भासहीत पुढे आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

लष्कर शिक्षण व संशोधन संस्था

१. जालना येथे राज्य राखीव पोलीस दलाचा गट क्रमांक ३ आहे.
२. महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे.

पुढारी

  • जालन्याचे रहिवासी अर्जुनराव खोतकर हे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले.
  • भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे जालन्याचे भूमिपुत्र आहेत.
  • कैलास गोरंट्याल आमदार आहेत.
  • अनिल भिमराव रत्नपारखे जालना (वजांर उम्रद)

नगरसेवक राजीनामा हे जालन्याचे भुमिपुञ आहेत.

  • बबन राव लोणीकर हे जालना जिल्ह्याचे माजी पालक मंत्री आहेत.
  • राजेश भैया टोपे हे जालन्याचे पालक मंत्री आणि आरोग्य मंत्री सुद्धा आहेत.
  • संगीता गोरंट्याल जालन्याच्या नगराध्यक्षा आहेत. त्या सर्वाधिक मताधिक्य घेऊन जिंकून आलेल्या नगराध्यक्षा आहेत.
  • संतोष सांबरे यांनी बदनापूर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे.
  • माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी अंबड तालुक्यात सर्वात मोठे रस्ता काम केलेले आहे.
  • माजी आमदार विलासराव खरात यांनी सहकारी क्षेत्रातील अनेक संस्था उदयास आणल्या आहेत.
  • स्व. अण्णासाहेब उढाण लोकप्रिय आमदार म्हणून प्रसिद्ध होते.
  • धिरजसिंह शिवाजीराव मोहिते-चव्हाण हंबीरराव मोहिते यांचे वंशज आहेत . ते सामाजिक कार्य करतात.
  • रावसाहेब दानवे यांचे सुपुत्र संतोष रावसाहेब दानवे हे भोकरदन - जाफराबाद मतदार संघाचे आमदार आहेत.
  • जालना जिल्ह्यातील पिंपळगाव (रेणुकाई) येथे सर्वात मोठी मिरची बाजारपेठ.

संदर्भ

साचा:संदर्भयादी

हे सुद्धा पहा

जालना जिल्हा

साचा:महाराष्ट्रातील जिल्हे खासगांव