हंबीरराव मोहिते

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:इतिहासलेखन हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते. त्यांची नेमणूक इ.स. १६७४ साली झाली.


छत्रपती शिवाजी महाराज यांनी हंसाजी मोहिते यांना हंबीरराव हा किताब देऊन आपल्या सेनेचे प्रमुख सेनापती म्हणून नेमले. बहलोलखानाशी लढताना प्रतापराव गुजर २४ फेब्रुवारी १६७४ रोजी मरण पावल्याने हंबीररावांची त्यांच्या जागी नेमणूक झाली.

महाराजांच्या द्वितीय पत्‍नी सोयराबाई या हंबीरराव मोहित्यांच्या भगिनी होत्या. हंबीररावांच्या कन्या महाराणी ताराबाई ह्या राजाराम महाराजांच्या पत्‍नी होत्या.

ज्यावेळी प्रतापराव पडल्याचे कळाले तेव्हा हंबीररावांनी आदिलशाहीच्या सेनेवर जबरदस्त हल्ला केला. शत्रूला विजापूरपर्यंत पिटाळून लावण्यात हंबीररावांचे मोठे योगदान आहे.

हम्बीररावांविषयी पुस्तके

  • सेनापती हंबीरराव मोहिते (चरित्र - लेखक डॉ. सदाशिव शिवदे)
  • जेधे शकावली, मराठा रियासत भाग १; डफ.) - केतकर ज्ञानकोशातील माहिती

चित्रपट

  • सरसेनापती हंबीरराव मोहिते (दिग्दर्शक - प्रवीण तरडे). स्वराज्याच्या निर्मिती आणि जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान असलेल्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे कार्य लवकरच २०२२ साली रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. पुण्यात शिवजयंतीच्या निमित्त निघालेल्या भव्य मिरवणूक सोहळ्यात लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाची घोषणा केली.[१]

हेसुद्धा पहा

साचा:मराठा साम्राज्य हंबीरराव मोहिते