Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
सिंहस्थ कुंभमेळा - मराठीपिडिया Jump to content

सिंहस्थ कुंभमेळा

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १७:०३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
सिंहस्थ कुंभमेळा, १९८९

सिंहस्थ कुंभमेळा हा त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र येथे दर बारा वर्षांनी घडणारा, हिंदू धर्मीयांचा मेळा आहे.[] जेव्हा गुरू आणि सूर्य सिंह राशीत प्रवेशतात आणि अमावास्या असते, तेव्हा गोदावरीच्या उगमस्थानावर त्र्यंबकेश्वर येथे हा मेळा भरतो. अशाच प्रकारचे कुंभमेळे हरिद्वार, प्रयाग, उज्जैन येथेही भरतात.

आख्यायिका व पौराणिक संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

समुद्रमंथनाने जो अमृतकुंभ समुद्राच्या बाहेर निघाला तेव्हा देवांना प्रश्न पडला, की जर दानवांनी हे अमृत प्राशन केले तर हे दानव अमर होऊन देव व मनुष्य यांना सळो की पळो करून सोडतील. तेव्हा देवांनी इंद्राचा पुत्र जयंत याला अमृतकुंभ घेऊन आकाशमार्गे पलायन करण्यास सांगितले. या अमृतकुंभाला देवांपासून हस्तगत करण्यासाठी दानवांनी देवांशी १२ दिवस भयंकर युद्ध केले. या युद्धकाळी अमृतकुंभामधून काही थेंब पृथ्वीवर पडले. हे अमृताचे थेंब हरिद्वार, प्रयाग, उज्जैनत्र्यंबकेश्वर येथे पडले. चंद्राने कलशामधून अमृत सांडताना वाचविले, सूर्याने अमृतकलशास फुटू दिले नाही व बृहस्पतीने राक्षसांपासून रक्षण केले म्हणून जेव्हा सूर्य, चंद्र व गुरू कुंभ राशीत प्रवेशतात तेव्हा कुंभमेळा भरतो. जेव्हा गुरू आणि सूर्य सिंह राशीत प्रवेशतात आणि अमावास्या असते, तेव्हा गोदावरीच्या उगमस्थानावर त्र्यंबकेश्वरात सिंहस्थ कुंभमेळा भरतो.

साधूंचे आखाडे[संपादन | स्रोत संपादित करा]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
कुंभमेळ्यातील साधू

कुंभमेळ्याच्या ठिकाणी विविध संप्रदायाचे आणि आखाड्याचे साधू एकत्र येतात आणि उपासना करतात. असे साधू होण्यासाठी विशिष्ट प्रक्रियेतून जावे लागते. कुंभमेळ्यात या सर्व साधूंचे विशेष महत्त्व असते.[]

  • अग्नी (शैव)
  • अटल (शैव)
  • आनंद (शैव) आखाडा :-

हा आखाडा संवत ९१२, सन ७७८ मध्ये स्थापन झाला. यांचे इष्टदेव श्री अग्नि व सूर्य आहे.

  • “‘आवाहन (शैव) ”’
  • उदासिनी पंचायती बडा आखाडा (शैव) :-

हा आखाडा संवत १८४४, सन १७१० मध्ये स्थापन झाला. या संप्रदायाचे संस्थापक श्रीचंद्र आचार्य उदासीन होते. यांच्यात आज नऊ असे एकत्रित सांप्रदायिक भेद आहेत.

  • उदासीन नया आखाडा (शैव) :-

हा आखाडा संवत १९०२, सन १७६८ मध्ये वरील उदासीन बडा आखाड्यातील कांही साधूंनी विभक्त होऊन स्थापन केला. यांचे प्रवर्तक महंत सुरदासजी होते.

  • खाकी आखाडा :
  • नाथपंथी गोरक्षनाथ मठ (आखाडा) :-

हा आखाडा संवत ९००, सन ८६६ मध्ये अहिल्या-गोदावरी संगमावर स्थापन झाला. यांचे संस्थापक पीर –पीर शिवनाथजी आहेत. याच आखाड्यात आदिनाथ मच्छिंद्रनाथगोरखनाथ असे योगी झाले. यांचे मुख्यदैवत गोरक्षनाथ (भैरव) आहे. यांच्यात बारापंथ आहेत. यांचेमधील अनेक योग्यांनी, ब्रह्मगिरी, कौलगिरी, येथे साधना केली.

  • जुना दत्त (भैरव) आखाडा :-

हा आखाडा संवत १२०२, सन १०६९ मध्ये कार्तिक शुक्ल १० रोजी कर्णप्रयाग येथे स्थापन झाला. यांचे इष्टदेव श्री रुद्रावतार दत्तात्रय आहेत.

  • दिगंबर (वैष्णव) :
  • निरंजनी आखाडा : -

हा आखाडा संवत ९६०, सन ८२६ मध्ये सोमवार रोजी मांडवी (कच्छ) येथे स्थापन झाला. यांचे इष्टदेव कार्तिक स्वामी आहेत.

  • निर्मल पंचायती आखाडा (शीख संप्रदायाचा आखाडा) :
  • निर्मोही (वैष्णव) :

हा आखाडा संवत १९१८, सन १७८४ मध्ये हरिद्वार कुंभाचे वेळी एका मोठ्या सभेत विचारविनियम होऊन दूरगाहसिंह महाराज यांनी स्थापन केला. यांचे इष्टदेव गुरुनानक ग्रंथसाहेब आहेत.

  • निर्वाणी (वैष्णव) :
  • पंच अग्नि आखाडा :-

हा आखाडा संवत ११९२, सन १०५८ मध्ये आषाढ शुक्ल ११ रोजी स्थापन झाला. यांची इष्ट देवता गायत्री आहे. यांच्यात चार शंकराचार्य पीठांचे ब्रम्हचारी साधू आहेत व महामंडलेश्वर आहेत.

  • महानिर्वाणी आखाडा :-

हा आखाडा संवत ८०५, सन ६७१ मध्ये मार्गशीर्ष शुक्ल १० गुरुवार, रोंजी झारवंड वैजनाथ – प्रांत बिहार येथे स्थापन झाला. यांचे इष्टदेव श्री कपील महामुनी आहेत.

  • वैष्णव बैरागी आखाडा :-

हा बालानंद वैष्णव आखाडा संवत १७२९, सन १५९५ मध्ये दारागंज येथे मध्वमुरारी यांनी स्थापन केला. कालांतराने यांचे चार संप्रदाय झाले. त्यात निर्मोही, निर्वाणी, खाकी असे भेद आहेत. प्रत्येक कुंभक्षेत्रावर यांचे स्नान संन्याशी दशनामी साधूंचे शाही स्नान झाल्यावर होत असते.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
कुंभमेळ्यातील गुरू आणि शिष्य साधू

हेही पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:विस्तार

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]