Jump to content

गुलाम नबी आझाद

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:३६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

गुलाम नबी आझाद (रोमन लिपी: Ghulam Nabi Azad) (मार्च ७, इ.स. १९४९ - हयात) हे राजकारणी आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत. आझाद हे 2005 ते 2008 दरम्यान जम्मू आणि काश्मीरचे ७ वे मुख्यमंत्री होते. तसेच ते आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री होते. फेब्रुवारी २०२१ पर्यंत त्यांनी राज्यसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले.[] त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये 27 ऑक्टोबर 2005 पर्यंत भारताचे संसदीय कार्य मंत्री म्हणून काम केले. नंतर त्यांची जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 2002च्या जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीतही त्यांनी पक्षाचे यशस्वी नेतृत्व केले.

भारत सरकारने 2022 मध्ये त्यांना सार्वजनिक व्यवहार क्षेत्रात पद्मभूषण हा भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला.[][]

राजकीय कारकीर्द[संपादन | स्रोत संपादित करा]

आझाद सर्वप्रथम इ.स. १९८० आणि इ.स. १९८४च्या लोकसभा निवडणुकींमध्ये महाराष्ट्र राज्यातील वाशिम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर ते इ.स. १९९० पासून इ.स. २००५ पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. त्यांनी पी.व्ही. नरसिंह राव आणि मनमोहनसिंग यांच्या राजवटीत केंद्रीय मंत्रिमंडळांत संसदीय कार्यमंत्री म्हणून काम सांभाळले. तसेच ते पी.व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात नागरी विमान वाहतूकमंत्री होते. इ.स. २००५ ते इ.स. २००८ या काळात ते जम्मू आणि काश्मीर राज्याचे मुख्यमंत्री होते. तसेच मे, इ.स. २००९पासून ते मनमोहनसिंग मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री आहेत.

विवाद[संपादन | स्रोत संपादित करा]

जून, इ.स. २००८ मध्ये आझाद सरकारने जमीन हिंदू मंदिरांच्या नावे करण्याचा निर्णय घोषित केला. अनेक मुस्लिम संघटनांनी याचा विरोध करत निदर्शने केली. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात आलासाचा:संदर्भ हवा. या निर्णयामुळे नाराज हिंदूंनी या निर्णयाचा निषेध व्यक्त केला, त्यातून उद्भवलेल्या दंगलींत ७ जणांचा बळी गेलासाचा:संदर्भ हवा. आघाडीचा घटक पक्ष असलेल्या जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने पाठिंबा काढून घेतल्याने आझाद सरकार बरखास्त झाले. आझाद यांनी जुलै ७, इ.स. २००८ रोजी पदाचा राजीनामा देत जुलै ११, इ.स. २००८ रोजी पद सोडले.

साचा:विस्तार साचा:संदर्भनोंदी