भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट भारतीय राजकीय पक्ष साचा:बदल

' भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (साचा:Lang-en) (INC, ज्याला बहुधा काँग्रेस म्हणतात) (साचा:Audio) हा भारतातील एक राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे.[१] काँग्रेसची स्थापना २८ डिसेंबर इ.स. १८८५ मध्ये ब्रिटिश राजाच्या काळी झाली; एलेन ओक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी स्थापन केली. मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशभरातील ७२ प्रतिनिधी एकत्र येऊन २८ डिसेंबर १८८५ रोजी 'इंडियन नॅशनल काँग्रेस' म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली. पूर्वनियोजित राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन २२ डिसेंबर १८८५ पुणे या ठिकाणी घेतले जाणार होते. मात्र पुण्यात प्लेगची साथ सुरू असल्यामुळे हे अधिवेशन मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत घेतले गेले. राष्ट्रीय काँग्रेसच्या या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कलकत्त्याचे ख्यातनाम वकील व्योमेशचन्द्र बॅनर्जी हे होते. राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून सरकार व जनता यांच्यामध्ये एक संवादात्मक स्वरूपाची वाटचाल सुरू झाली. काँग्रेस याचा अर्थ संघटना असा होतो. सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेसचे नेतृत्व हे मवाळ गटाकडे होतं. पुढे १९०६ ते १९१९ पर्यंत काँग्रेसचे नेतृत्व जहाल गटाकडे होतं(लोकमान्य टिळक,नेताजी सुभाषचंद्र बोस,गोपाळ गणेश आगरकर). त्यानंतर मात्र १९२० ते १९४७ या काळामध्ये संपूर्ण काँग्रेसचे नेतृत्व हे महात्मा गांधींनी केलं. 'महात्मा गांधी म्हणजे एका माणसाचे सैन्य' असे गौरवोद्गार त्यांच्यासंदर्भात माऊटबॅटन यांनी काढले होते. १९व्या शतकाच्याच्या शेवटी आणि २०व्या शतकाच्या मध्यपर्यंत, काँग्रेस भारताचा स्वातंत्र्यलढ्यात, आपल्या १.५ कोटी पासून जास्त सदस्य आणि ७ कोटी पासून जास्त सहभागींसोबत, ब्रिटिश वसाहती शासनाच्या विरोधात एक केंद्रीय भागीदार बनली. आजही काँग्रेसला मानणारा मोठा जनसमूह भारतामध्ये आहे. गांधी आणि नेहरू घराण्याची परंपरा लाभलेल्या काँग्रेस पक्षाने भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि स्वातंत्र्यानंतर देखील देशाच्या राजकारणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. महत्त्वाच्या राष्ट्रीय पक्षांमध्ये काँग्रेस पक्षाचे स्थान कायम आहे. मधल्या काळामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला अनेक स्थित्यंतरातून जावे लागले. देशातील अंतर्गत घडामोडी, स्थित्यंतरे, पक्ष राजकारण या समस्यांना तोंड देत भ्रष्टाचार बेरोजगारी अशा अनेक समस्या सरकार समोर होत्या. आर्थिक मंदी यासारख्या समस्यांना तोंड देत सत्तेवर असताना काँग्रेस पक्षाने देशाच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान अनुयायी होते. महात्मा गांधींच्या समवेत त्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. पंचशील करार, अलिप्ततावाद यासारख्या महत्त्वपूर्ण धोरणाचे ते समर्थक होते. अवजड उद्योग उभारणाऱ्या यंत्रणा देशामध्ये उभ्या राहिल्या पाहिजेत असं त्यांचं स्पष्ट मत होतं. त्या काळामध्ये रशियन राज्यक्रांतीने जी प्रगती घडून आली, आपल्याही देशांमध्ये अशाच प्रकारे प्रगती झाली पाहिजे यासाठी त्यांनी पंचवार्षिक योजनाचा स्वीकार केला. याचबरोबर कृषीक्षेत्र औद्योगिकक्षेत्र, संशोधन यासारख्या घटकांना त्यांनी प्राधान्यक्रम दिला. काँग्रेस संघटनाच्या माध्यमातून पक्षाचे सर्व ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी केलं. धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या आधारे संपूर्ण देशाच्या विकासाचा आराखडा काँग्रेस सरकारने तयार केला. काँग्रेसच्या पक्षीय राजकारणामध्ये नेहरू आणि गांधी घराण्याचे योगदान महत्त्वपूर्ण राहिलेला आहे.[२]

उद्देश

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या घटनेनुसार[३], एक संसदीय लोकशाही असलेले समाजवादी राष्ट्र जिथे संधी तसेच राजकीय, आर्थिक आणि सामाजिक हक्कांत समानता व जागतिक शांततेचे उद्दीष्ट आहे, अशा भारतीय नागरिकांचे आणि भारतीय प्रशासनाची शांततापूर्वक आणि घटनात्मक मार्गाने प्रगती व कल्याण करणे हा सदर पक्षाचा उद्देश आहे.

स्थापना आणि पहिले अधिवेशन

श्री सुरेन्द्र्नाथ बॅनजी॔ यांनी अखिल भारतीय पातळीवर एका संघटनेची स्थापना करता यावी म्हणून अत्त्यंत जोमाने तयारी चालविली होती. त्या उद्देशानेच १८८३ च्या डिसेंबर महिन्यात त्यांनी ' इंडियन नॅशनल कॉन्फरन्स 'चे पहिले अधिवेशन बोलाविले होते. राष्ट्रभर दाैरे करून सरकारच्या धोरणावर प्रखर टीका केली . सर्वत्र त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी मात्र त्यांचा कसून विरोध केला व ती प्रतिगामी चळवळ असल्याची घोषणा केली.

ए. ओ. ह्यूम व लाॅड॔ डफरिनने मिळून बॅनजी॔ची चळवळ हाणून पाडण्यासाठी योजनाबद्ध कार्यवाहिला सुरुवात केली. भारतातील सौम्य विचारांच्या सर्व राजकीय नेत्यांना आवाहन करून त्या सर्वाना एकत्रित आणून ब्रिटिश सत्तेला अनुकूल अशा राष्ट्रीय पातळीवरील एका संघटनेची स्थापना करण्यासाठी अतोनात धडपड केली. इ. स. १८८४ मध्ये ' इंडियन नॅशनल युनियन 'ची स्थापना करण्यात आली. या संस्थेचे एक अखिल भारतीय संमेलन मार्च १८८५ मध्ये पुणे येथे भरवण्याचे ठरले परंतु पुण्यात यावेळी cholera प्प्दुर्भाव झाल्याने , २७ डिसेंबर १८८५ रोजी ते मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत काॅलेजच्या प्रशस्त सभाग्रहात भरविण्यात आले. या संमेलनाला भारताच्या निरनिराळ्या भागातून ७२ प्रतिनिधी आले होते. अशा प्रकारे प्रथमच देशाच्या निरनिराळ्या भागातून प्रतिनिधीनी एकत्रित येण्याची ही घटना अपूर्व मानली जाते. या संमेलनाचे अध्यक्षपद बंगालचे श्री उमेशचंद्र बॅनजी॔ यांनी भूषविले. फिरोजशहा मेहता, दादाभाई नौरोजी , के. टी. तेलंग , दिनशाॅ वाछा इत्यादी सुप्रसिद्ध व्यक्तीहि उपस्थित होत्या. काँग्रेसचा जनक समजला जाणारा ह्यूम पण या अधिवेशनाला खास उपस्थित राहण्यासाठी इंग्लंडहून परत आला होता. याशिवाय स्थानिक पत्रकार व नेतेही उपस्थित होते.

स्वातंत्र्यपूर्व काळातील धोरणे

संस्थानांबाबतचे धोरण

इ.स. १९३६ च्या फैजपूर येथील अधिवेशनात काँग्रेसने सर्व संस्थानातील प्रजेस स्वयंनिर्णयाचा अधिकार मिळावा अशी मागणी करून त्याबाबतचा संघर्ष त्या त्या संस्थानातील जनतेने चालू करावा असे मत व्यक्त केले. पुढच्याच वर्षी इ.स. १९३७ च्या अधिवेशनात या आशयाचा ठराव मंजूर करून संस्थानी प्रजेच्या लोकशाही हक्कांच्या चळवळीचे व स्वतंत्र नागरिक म्हणून त्यांच्या अधिकारांचे काँग्रेसने समर्थन केले होते.

पक्षांतर्गत संरचना

या पक्षात 'अध्यक्ष' हा पक्षाचा प्रमुख असतो. आवश्यकता वाटल्यास उपाध्यक्ष पदाची नेमणूक अध्यक्ष करू शकतो. अध्यक्षपदाची निवडणूक दरवर्षी होणे गरजेचे आहे. मात्र एकाच व्यक्तीने सलग किती वेळा अध्यक्ष व्हावे यावर बंधन नाही. पंडित नेहरू असेपर्यंतच्या काळात ते फार क्वचित अध्यक्ष होते मात्र श्रीमती इंदिरा गांधींनी ही दोन्ही पदे एकाच व्यक्तीने भूषावयाची प्रथा सुरू केली जी पी.व्ही.नरसिंह राव यांच्यापर्यंत चालत आली. त्यानंतर श्रीमती सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद दुसऱ्या व्यक्तीकडे सोपवून पुन्हा सत्ताकेंद्रांची विभागणी केली.

अध्यक्षाची निवडणूक झाल्यावर तो उपाध्यक्ष, जनरल-सेक्रेटरीज्, कोशाध्यक्ष, प्रभारी आणि सेक्रेटरीजची निवड करतो. या पदांवर किती व्यक्तींची निवड करावी यावर कोणतेही बंधन नाही. सध्या १ उपाध्यक्ष (श्री. राहुल गांधी), १ कोशाध्यक्ष (श्री.मोतीलाल व्होरा), १ पॉलिटिकल सेक्रेटरी (श्री.अहमद पटेल), ९ जनरल सेक्रेटरी, ८ स्वतंत्र प्रभारी, आणि ३५ सेक्रेटरीज् आहेत

काँग्रेस वर्किंग कमिटी काँग्रेस पक्षामध्ये "काँग्रेस वर्किंग कमिटी" (ज्याला 'हाय कमांड' म्हटले जाते) अश्या नावाचा एक अधिकारी गट आहे. या एका गटाला कोणत्याही प्रश्नावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या गटाने घेतलेला निर्णय हा अंतिम आणि सर्वोच्च मानला जातो. पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष व उपाध्यक्ष या गटाचे पदसिद्ध अध्यक्ष व उपाध्यक्ष असतात. या गटातही किती व्यक्ती असाव्यात यावर संख्येचे बंधन नसले तरी अध्यक्ष व उपाध्यक्ष सोडून साधारणतः १५ ते २० व्यक्ती या गटात असतात. सध्या या गटाचे १९ सदस्य आहेत. ज्यात श्रीमती सोनिया गांधी अध्यक्षा आणि श्री राहुल गांधी हे उपाध्यक्ष आहेत, तर याव्यतिरिक्त सर्वश्री डॉ.मनमोहन सिंग, ए.के.ॲंटनी, मोतीलाल व्होरा, गुलाम नबी आझाद, दिग्विजय सिंग, जनार्दन द्विवेदी, ऑस्कर फर्नांडिस, मुकुल वासनिक, बी.के.प्रसाद, बिरेंदर सिंग, डॉ.कर्नल डी.आर.शांडिल, मधुसूदन मिस्त्री, अहमद पटेल, अंबिका सोनी, हेमो प्रोवा सैकिया, सिशीला तिरीया आणि विलास मुत्तेमवार यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त १८ व्यक्ती पर्मनंट इन्व्हायटीज आणि ६ स्पेशल इन्व्हायटीज आहेत.

याचबरोबर ६ अधिकृत पक्षप्रवक्ते आहेत. शिवाय विविध विषयांवरच्या अनेक समित्या आहेत (ज्यात चार सदस्यांची डिसिप्लनरी समितीही आहे)

राज्यस्तरावर प्रदेश काँग्रेस कमिटी (PCC) नावाची स्थानिक समिती असते जिचे स्वरूप केंद्रीय समितीप्रमाणेच, फक्त राज्यस्तरावर, असते. अध्यक्षपदाच्या निवडणूकीत राष्ट्रीय ऑफिस बेअरर्स तसेच प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सदस्यांना मताधिकार असतो.

केंद्रीय निवडणूक विभाग केवळ काँग्रेस असा एकच पक्ष आहे ज्यात "केंद्रीय निवडणूक विभाग" नावाचा स्वायत्त विभाग आहे. सदर विभाग ,पक्षांतर्गत निवडणुका झाल्यास त्या निष्पक्ष होतील याची खबरदारी घेतो.

हल्लीच्या भारतामध्ये काँग्रेस हा शब्द नावात असलेले अनेक राजकीय पक्ष किंवा गोष्टी आहेत किंवा होते. त्यांची नावे अशी :-

'काँग्रेस' नावात असलेले इतर पक्ष

महत्त्वाचे नेते आणि पक्षाशी निगडित व्यक्ति

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातले गुन्हेगार नेते

पक्षाचे चिन्ह

पूर्वी सुरुवातीला या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह गाय आणि वासरू होते.नंतर ते हाताचा पंजा असे झाले आहे.

संदर्भ

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे

साचा:भारतीय राजकीय पक्ष

साचा:भारतीय स्वातंत्र्यलढा