Jump to content

सुशीलकुमार शिंदे

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट मुख्यमंत्री सुशीलकुमार संभाजीराव शिंदे (सप्टेंबर ४, इ.स. १९४१; सोलापूर, महाराष्ट्र) हे भारतीय मराठी राजकारणी आहेत. १६ जानेवारी इ.स. २००३ ते १ नोव्हेंबर, इ.स. २००४ या काळात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. इ.स. २००४ ते इ.स. २००६ या कालखंडात ते आंध्र प्रदेशाच्या राज्यपालपदी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात असून मनमोहनसिंग मंत्रिमंडळात भारताचे गृहमंत्री होते.

सुशीलकुमार शिंदे यांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून सलग नऊ वेळा अर्थसंकल्प मांडला. सलग साडेसहा वर्षे केंद्रीय ऊर्जामंत्री पदावर राहणारे व लोकसभेच्या नेतेपदी निवड होणारे ते पहिले मराठी नेते आहेत.

प्रारंभी जीवन[संपादन | स्रोत संपादित करा]

सुशीलकुमारांचा बालपण ते राजकारणपूर्व जीवन प्रवास खडतर होता. वडिलांच्या निधनानंतर घरची परिस्थिती खालावत गेली. आठवी उत्तीर्ण झाल्यानंतर सोलापूरच्या न्यायालयात शिरस्तेदाराची (शिपाई म्हणून) नोकरी मिळाली. वकिलांना पुकारायचे ते काम होते. एकीकडे शिरस्तेदारांची नोकरी आणि दुसरीकडे शाळा सुरू होती. हातात दोन पैसे येत असल्याचे समाधान होते. नोकरी करीत असताना त्या वेळी शाळेत बसविलेल्या नाटकातही काम केले. न्यायालयात दहा वर्षे नोकरी केल्यानंतर तेथे बढती मिळून क्‍लार्कची जागा मिळाली. १९६५ मध्ये बीएची पदवी घेतल्यानंतर नोकरीचा राजीनामा दिला आणि कायद्याच्या अभ्यासासाठी पुणे गाठले. पुण्यातील लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना तेथे विद्यार्थी चळवळीतही सहभाग घेतला. त्या वेळी शरद पवारांशी भेट झाली. काकासाहेब गाडगीळांनीही मदतीचा हात दिला. कायद्याचे शिक्षण आणि विद्यार्थी चळवळ सुरू असतानाच त्या वेळी वर्तमानपत्रात पोलीस उपनिरीक्षकपदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यांना उपनिरीक्षक म्हणून नोकरी मिळाली, तिच्यातूनच मुंबईत सीआयडी विभागात नवी नोकरी सुरू झाली. ही नोकरी करीत असतानाच सुशीलकुमारांनी एल्‌‍एल्‌‍बीचे शिक्षण पूर्ण केले.

राजकीय कारकीर्द[संपादन | स्रोत संपादित करा]

पोलिस निरीक्षक असल्याने सुशिलकुमार शिंदे यांचा राज्यकर्त्यांशी संबंध यायचा. पुढे मुंबईत एके दिवशी शरद पवारांची दुसऱ्यांदा भेट झाली. परिचय वाढत गेला. घट्ट मैत्री झाली. राजकारणात प्रवेश करण्याविषयी विचारणा झाली. प्रदेश काँग्रेस कमिटीत कामास सुरुवात करण्याची तयारी दाखविली. पुन्हा नोकरीचा राजीनामा दिला. पवारांनी पुढे विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी तयार केले.

६ नोव्हेंबर १९७१ला शिंद्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि ९ नोव्हेंबरपासून सोशॅलिस्ट फोरमचा निमंत्रक म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

१९७२मध्ये सोलापूर (करमाळा तालुका) मतदार संघातून तिकीट मिळणार होते. मात्र, ते ऐनवेळी मिळाले नाही. पुढे या मतदारसंघाचे आमदार ताराप्पा सोनवणे यांचे आकस्मित निधन झाले. पोटनिवडणूक लागली. शिंदे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. विजय संपादन करून ते २३ एप्रिल १९७३ रोजी प्रथमच आमदार झाले.[][][]

चरित्र[संपादन | स्रोत संपादित करा]

सुशील कुमार शिंदे यांची पाच-सात चरित्रे प्रकाशित झाली आहेत, त्यांतली ही तीन :-

  • सुशीलकुमार : एक प्रवास (रविकिरण साने)
  • ’सुशीलकुमार शिंदे - एका संघर्षाची वाटचाल’ (चरित्रग्रंथ) मराठी अनुवादक : संतोष शेणई, प्रकाशक : अमेय प्रकाशन. (मूळ इंग्रजी पुस्तक-हू रोट माय डेस्टिनी, लेखकः डॉ.पी.आर.सुबास चंद्रन)
  • ’Sushilkumar Shinde: a child of destiny’ - लेखक एन.बी. घोडके

पुरस्कार[संपादन | स्रोत संपादित करा]

  • ५ जानेवारी १९७७ : भारतीय जयसेजने देशाच्या दहा लक्षणीय तरुणांमध्ये निवडले.
  • १९७८ : 'मनोहर' साप्ताहिकाने सर्वेक्षणात सर्वात लोकप्रिय मंत्री म्हणून दुसरा पर्याय.
  • १९८१: काँग्रेस पार्टीने "बसव भूषण पुरस्कार" म्हणून "आदर्श युवा" म्हणून सन्मानित केले.
  • ९ मार्च १९९6: मदर टेरेसाच्या हस्ते संसदेच्या सर्वोत्तम सदस्या म्हणून "राष्ट्रीय नागरिक पुरस्कार".
  • २००३: भाई बागल पुरस्कार २००३, इंडिया टुडे येथे तिसरा स्थान - वाचकांची निवड सर्वोत्तम मुख्यमंत्री.
  • २००५: ज्येष्ठ पत्रकार अरुण तिकेकर यांच्या हस्ते गुरुवार्या शंकरराव कानिटकर पुरस्कार.
  • २३ जानेवारी २००७: फर्स्ट डी लिट. डी वाई पाटील युनिव्हर्सिटीकडून सन्मानित (विषय - साहित्य)
  • ९ सप्टेंबर २००७: २ रा डी लिट. श्रीकृष्णा देवराई विद्यापीठ, आंध्रप्रदेशने पदवी दिली. (विषय - साहित्य)
  • १८ फेब्रुवारी २००९: थर्ड डी लिट. राजीव गांधी टेक्निकल युनिव्हर्सिटी, भोपाळ यांनी सन्मानित केले. (विषय - विज्ञान)
  • ९ मे २००९: नवशक्ती टाइम्सने "नवशक्ती जीवन गौरव पुरस्कार" दिला.
  • सुशीलकुमार शिंदे आणि पत्‍नीला - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा यशवंत-वेणू पुरस्कार (३-१०-२०१७)

वादग्रस्त विधाने[संपादन | स्रोत संपादित करा]

  • "हा अतिशय गंभीर विषय आहे. सिनेमाचा विषय नाही. तुम्‍ही बसा," श्री.सुशीलकुमार जया बच्चन यांना उद्देशून राज्यसभेत बोलले. नंतर त्यांनी जया बच्चन यांची माफी मागितली.[]
  • "लोक बऱ्याच गोष्टी विसरत असतात. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात झालेले पेट्रोल पंपवाटपाचे प्रकरणही लोक विसरले. त्यामुळे कथित कोळसा प्रकरणही विसरायला वेळ लागणार नाही. कोळशाचे तर असे आहे, तो धुतला की पुन्हा स्वच्छ................ ' -कविवर्य नारायण सुर्वे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना []

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]


साचा:क्रम

साचा:महाराष्ट्र मुख्यमंत्री