Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२१

मराठीपिडिया कडून

साचा:गल्लत साचा:Infobox cricket tour भारत क्रिकेट संघाने पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ दरम्यान इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धे अंतर्गत खेळविण्यात आली. भारताने इंग्लंड मालिकेपूर्वी जून २०२१ मध्ये न्यू झीलंड विरुद्ध साउथहॅंप्टनमध्ये २०१९-२१ कसोटी विश्वचषकाचा सामना खेळला. ज्यात न्यू झीलंडने भारताला ८ गडी राखून हरविले होते.

२०१९-२१ कसोटी विश्वचषकाचा अंतिम सामना आणि इंग्लंड दौरा सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत शिखर धवनच्या नेतृत्वात भारताच्या दुय्यम संघाने श्रीलंकेचा दौरा केला. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारताने दोन सराव सामने खेळले.

पहिली कसोटी सातत्याने पावसाचा व्यत्यत आल्याने अनिर्णित सुटली. भारताने दुसरी कसोटी १५१ धावांनी जिंकली आणि मालिकेत १-० ने आघाडी घेतली. इंग्लंडने अपेक्षेप्रमाणे तिसरी कसोटी जिंकली. तिसऱ्या कसोटीत भारताचा डावाने पराभव झाला. चौथ्या कसोटीत अनपेक्षितरित्या भारताने १५७ धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिकेत २-१ ने पुन्हा आघाडी घेतली. सन १९८६ नंतर भारताने इंग्लंडमध्ये एका मालिकेत प्रथमच दोन कसोटी सामने जिंकले. चौथ्या कसोटी दरम्यान भारताचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचे उघडकीस आले. त्या दोघांना लागलीच विलगीकरण कक्षात हलविण्यात आले. पाचवी कसोटी सुरू होण्याच्या आदल्या दिवशी भारताच्या सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली. जरी सर्व खेळाडूंच्या चाचण्या नकारात्मक आल्या तरी पाचवी कसोटी सुरू व्हायच्या फक्त तीन तास आधी सामना रद्द झाल्याचे ईसीबीकडून जाहिर करण्यात आले.

ईसीबीच्या अधिकृत संकेतस्थळावरील बातमीनुसार भारताने पाचवा सामना त्याग करून इंग्लंडला बहाल केला असे नमूद करण्यात आले होते. याचा अर्थ मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. परंतु भारताने यावर आक्षेप घेत सामन्याचा निकाल काय लावावा यासाठी आयसीसीच्या तंटा निर्मुलन समितीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आलेल्या एका वृत्तानुसार अशीही चर्चा चालू होती की शेष कसोटी सामना हा पुढील वर्षी खेळविण्यात यावा आणि ही मालिका तोपर्यंत स्थगित करण्यात यावी. आयसीसीच्या तंटा निर्मुलन समितीने जर भारताने सामना त्याग करून बहाल केला असा निर्णय दिला तर ५ सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सुटेल आणि सामना रद्द करावा लागला असा निर्णय झाला तर भारत मालिका २-१ ने जिंकेल.

सराव सामने[संपादन | स्रोत संपादित करा]

तीन-दिवसीय प्रथम-श्रेणी सामना:काउंटी निवड XI वि भारतीय[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

२०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:मुख्यलेख

१ली कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

२री कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

३री कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

४थी कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

५वी कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Reflist साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२१ साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे