भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२१

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Infobox cricket tour भारतीय क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जुलै २०२१ दरम्यान श्रीलंकेचा दौरा केला. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळविण्यात आली. पूर्वनियोजनाप्रमाणे हा दौरा जून २०२० मध्ये होणार होता. परंतु कोरोनाव्हायरसच्या फैलावामुळे दौरा पुढे ढकलण्यात आला होता, तथापि जुलै २०२१ मध्ये दौरा होणार असल्याचे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने जाहीर केले. १३ जुलै पासून दौऱ्याला सुरुवात होणार होती परंतु ९ जुलै २०२१ रोजी श्रीलंकेचे फलंदाजी प्रशिक्षक आणि काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे दौरा पाच दिवसांनी पुढे ढकलण्यात आला.

भारताचा कसोटी संघ विराट कोहलीच्या नेतृत्वात इंग्लंडमध्ये कसोटी विश्वचषकाचा अंतिम सामना आणि इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी जून २०२१ पासून इंग्लंड मध्ये आहे. त्यामुळे कसोटी विश्वचषकाचा अंतिम सामना आणि इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत शिखर धवनच्या नेतृत्वात भारताचा दुय्यम दर्जाचा संघ श्रीलंकेला रवाना झाला. दौऱ्यापूर्वी श्रीलंकन बोर्डाने कुशल परेराला कर्णधारपदावरून हटवत संघाची जवाबदारी दासून शनाकाकडे दिली.

भारताने एकदिवसीय मालिकेत २-१ ने विजय मिळवला. श्रीलंकेने ट्वेंटी२० मालिका २-१ ने जिंकत भारताविरुद्ध पहिला वहिला ट्वेंटी२० मालिका विजय संपादन केला. क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात ऑगस्ट २००८ नंतर श्रीलंकेने भारताविरुद्ध द्विपक्षीय मालिका जिंकली.

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२रा सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

३रा सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२रा सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

३रा सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२१ साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे श्रीलंका दौरे