Jump to content

महानगर टेलिफोन निगम लिमिटेड

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट कंपनी महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (इंग्लिश: Mahanagar Telephone Nigam Limited, साचा:BSE, साचा:NSE, संक्षेप: एम.टी.एन.एल.) ही भारत देशामधील एक दूरध्वनी सेवा पुरवणारी कंपनी आहे. एम.टी.एन.एल. देशाच्या दिल्लीमुंबई ह्या दोन सर्वात मोठ्या महानगरांमध्ये दूरध्वनी व इतर संलग्न सेवा पुरवते. १०० टक्के भारत सरकारच्या मालकीची असलेली व भारतामधील नवरत्‍न कंपन्यांपैकी एक असलेली एम.टी.एन.एल. गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने तोट्यात चालत आहे. भारतामधील मोबाईल फोन वापरामध्ये झालेली लक्षणीय वाढ व खाजगी स्पर्धकांच्या तुलनेत एम.टी.एन.एल.ची कमकुवत व विस्कळीत सेवा हे ह्यामागील प्रमुख कारण मानले जाते.

भारत संचार निगम लिमिटेड ही दुसरी सरकारी दूरसंचार कंपनी दिल्ली व मुंबई व्यतिरिक्त भारताच्या इतर भागांमध्ये दूरध्वनी सेवा चालवते.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:कॉमन्स वर्ग

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

साचा:नवरत्‍न कंपन्या