Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
विक्रमशिला विद्यापीठ - मराठीपिडिया Jump to content

विक्रमशिला विद्यापीठ

मराठीपिडिया कडून
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
विक्रमशिला विद्यापीठाचे भग्नावशेष

साचा:Location map विक्रमशिला विद्यापीठ हे प्राचीन भारतातील पाल साम्राज्यात असलेले एक बौद्ध शिक्षणकेंद्र होते. नालंदा विद्यापीठाप्रमाणेच येथेही अनेक देशांतून विद्यार्थी अध्ययनासाठी येत असत. विक्रमशिला विद्यापीठ हे रसायनशास्त्र, रसशास्त्र आणि आयुर्वेद याचे फार मोठे केंद्र होते विक्रमशिला विद्यापीठ हे आजच्या बिहारमधील भागलपूरजवळ येथे होते धर्मपालन नावाच्या राजाने या विद्यापीठाची स्थापना इसवी सनाच्या आठव्या शतकामध्ये केली या ठिकाणी सहा विहार होते प्रत्येक विहाराचे प्रवेशद्वार स्वतंत्र होते.[] साचा:बौद्ध पवित्रस्थळे

पार्श्वभूमी[संपादन | स्रोत संपादित करा]

विक्रमशिला विद्यापीठ हे सध्याच्या बिहार राज्याच्या भागलपूर जिल्ह्यात भागलपूरपासून पूर्वेला ५० कि.मी. अंतरावर असणाऱ्या अंतीचक येथे होते. पाल घराण्यातील राजा धर्मपाल याने नवव्या शतकाच्या सुरुवातीला विक्रमशिला विहाराची स्थापना केली. हाच विहार पुढे ‘विक्रमशिला विद्यापीठ’ या नावाने प्रसिद्ध झाला. धर्मपालाचे दुसरे नाव विक्रमशील असल्यामुळे या विद्यापीठाचे नाव विक्रमशीला ठेवण्यात आले. रत्नाकरशांती, वागीश्वरकीर्ती, भट्टारक नरोत्पल, प्रज्ञाकरमती, रत्नवज्र, ज्ञानश्रीमित्र हे विद्वान पंडित या विद्यापीठात अध्यापनकार्य करीत होते. विक्रमशिला विद्यापीठाच्या मध्यभागी महाबोधीची कलाकृती असलेले देवालयहोते. येथे एक विशाल सभाभवन होते. त्यात एका वेळी आठ हजार व्यक्तींची बसण्याची सोय होती. प्रवेशद्वारात उजव्या बाजूस नालंदा विद्यापीठाचे प्रमुख आचार्य नागार्जुनाचे चित्र होते, तर डाव्या बाजूस याच विद्यापीठाचे प्रमुख अतीश दीपंकराचे चित्र होते. विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार बंद झाल्यावर येणाऱ्यांसाठी या प्रवेशद्वाराबाहेर एक धर्मशाळा होती. विद्यार्थ्यांची येथे विनामुल्य निवासभोजनाची व्यवस्था असे.

अस्त[संपादन | स्रोत संपादित करा]

इ.स. ११९३ साली बख्तियार खिलजी या तुर्की आक्रमकाने विक्रमशिला विद्यापीठ पूर्णपणे उध्वस्त केले.[].

उत्खनन[संपादन | स्रोत संपादित करा]

विक्रमशिला विद्यापीठ ज्या ठिकाणी होते तिथे सर्वप्रथम पाटणा विद्यापीठातर्फे इ.स. १९६० ते इ.स. १९६९पर्यंत आणि त्यानंतर भारतीय पुरातत्त्व खात्याच्या वतीने इ.स. १९७२ ते इ.स. १९८२पर्यंत उत्खनन केले गेल्यामुळे विक्रमशिला विद्यापीठाबाबतच्या अनेक गोष्टी उजेडात आल्या. या विद्यापीठाभोवती नऊ फूट उंचीची भिंत होती.

चित्रदालन[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ व नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

साचा:विस्तार