सेक्टर १६ स्टेडियम
सेक्टर १६ मैदान (साचा:Lang-pa, साचा:Lang-hi) हे भारतातील चंदिगढ स्थित एक क्रिकेट मैदान आहे.
ह्या मैदानावर पहिला एकदिवसीय सामना जानेवारी १९८५ मध्ये आणि एकमेव कसोटी सामना १९९० साली खेळवला गेला.
कपिल देव, चेतन शर्मा आणि युवराज सिंग ह्यासारख्या दिग्गज खेळाडूंनी त्यांच्या क्रिकेटची सुरुवात सेक्टर १६ स्टेडियमवरून केली. जवळच्या पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदानामुळे ह्या मैदानाचे महत्त्व कमी झाले.
मोहालीमध्ये नवे मैदान तयार झाल्यानंतर पुढची १० वर्षे सेक्टर १६ स्टेडियमवर एकही प्रथम श्रेणी सामना खेळवण्यात आला नाही, त्यानंतर २००४/०५ च्या रणजी मोसमातील उपांत्य सामना येथे खेळवण्यात आला. ऑक्टोबर २००७ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान येथे एकदिवसीय सामना खेळवण्यात आला.
नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट[संपादन | स्रोत संपादित करा]
फलंदाजी[संपादन | स्रोत संपादित करा]
- सर्वाधिक धावा - नवज्योतसिंग सिद्धू (भारत) – २ सामन्यांमध्ये १८० धावा
- एका डावात सर्वाधिक धावा – जेफ मार्श (ऑस्ट्रेलिया) – १२६*
गोलंदाजी[संपादन | स्रोत संपादित करा]
- सर्वाधिक बळी - कपिल देव (भारत) – ३ सामन्यांमध्ये ४ बळी
- एका डावात सर्वोत्तम गोलंदाजी – तिरुमलाई शेखर (भारत) – ३/२३
कसोटी क्रिकेट[संपादन | स्रोत संपादित करा]
फलंदाजी[संपादन | स्रोत संपादित करा]
- सर्वाधिक धावा - रवी शास्त्री (भारत) – ८८ धावा
- एका डावात सर्वाधिक धावा – रवी शास्त्री (भारत) – ८८ धावा
गोलंदाजी[संपादन | स्रोत संपादित करा]
- सर्वाधिक बळी - वेंकटपती राजू (भारत) – १ सामन्यात ८ बळी
- एका डावात सर्वोत्तम गोलंदाजी – वेंकटपती राजू (भारत) – ६/१२
आंतरराष्ट्रीय सामन्यांची यादी[संपादन | स्रोत संपादित करा]
कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
आजवर मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[१]:
| दिनांक | संघ १ | संघ २ | विजयी संघ | फरक | धावफलक |
|---|---|---|---|---|---|
| २३-२७ नोव्हेंबर १९९० | साचा:Cr | साचा:Cr | साचा:Cr | १ डाव आणि ८ धावा | धावफलक |
एकदिवसीय[संपादन | स्रोत संपादित करा]
आजवर मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[२]:
| दिनांक | संघ १ | संघ २ | विजयी संघ | फरक | धावफलक |
|---|---|---|---|---|---|
| २७ जानेवारी १९८५ | साचा:Cr | साचा:Cr | साचा:Cr | ७ धावा | धावफलक |
| २७ ऑक्टोबर १९८७ | साचा:Cr | साचा:Cr | साचा:Cr | १७ धावा | धावफलक |
| २५ डिसेंबर १९९० | साचा:Cr | साचा:Cr | साचा:Cr | ९ गडी | धावफलक |
| २१ जानेवारी १९९३ | साचा:Cr | साचा:Cr | साचा:Cr | ५ गडी | धावफलक |
| ८ ऑक्टोबर २००७ | साचा:Cr | साचा:Cr | साचा:Cr | ८ धावा | धावफलक |