Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
कासे (संगमेश्वर) - मराठीपिडिया

कासे (संगमेश्वर)

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:१६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र

कासे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.चित्रपट दिग्दर्शक रवी जाधव व सनदी अधिकारी डॉ.अश्विनी जोशी यांचे हे मूळ गाव.

भौगोलिक स्थान संपादन

हवामान संपादन

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन संपादन

२०११ च्या जनगणनेनुसार कासे गावांची लोकसंख्या २०११ आहे. त्यापैकी ५४४ पुरुष आणि ७६१ महिला आहेत.[]

कासे गाव पंधरा वाड्यांचे बनलेले आहे. पिंपळवाडी, घाणेकर वाडी, जड्यार/ गोताड वाडी, आडावराची वाडी, भंडारी वाडी, बुद्धवाडी, बहादूरवाडी,

(गुरव) कदमवाडी, शिगवण वाडी, राव वाडी, कोंडी वाडी, ब्राह्मण वाडी, गणेश वाडी, वरची जड्यार वाडी, वरची कातकर वाडी या पंधरा वाड्या आहेत.

गावात मुख्यत: जोशी, पाटणकर, मालशे, परांजपे, सुर्वे, खोत, गवंडे कुटुंबियांची घरे आहेत.

होळी (शिमगा) हा गावातील सर्वांत मोठा सार्वजनिक उत्सव आहे.

प्रेक्षणीय स्थळे संपादन

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
श्री देव गजानन मंदिर

 

कासे गावात श्री देव गजानन मंदिर हे सुमारे ३०० ते ४५० वर्षे जुने भाटे कुटुंबियांनी बांधलेले मंदिर आहे.[] या मंदिरात गणेश चतुर्थी आणि माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यासाठी बाहेरगावी असलेले ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर हजेरी लावतात. १९७०-७२ च्या सुमारास मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि मंदिराच्या आवारात असलेली श्री देव हनुमान आणि श्री देव शंकर यांची छोटी मंदिरे गजानन मंदिराच्या आत हलवण्यात आली. या मंदिराची व्यवस्था 'कासे ग्राम गजानन सेवा मंडळ' पाहते. माघी गणेशोत्सवाच्या वेळी इ.स. १९२२ पासून नाटक, लळीत इ. ग्रामस्थ मंडळीनीच सादर करण्याची परंपरा आहे.[] मूळचे कासे गावातील असलेले सुप्रसिद्ध वैद्य ना.ह.जोशी यांच्या स्मृत्यर्थ मंदिराच्या समोर ‘कै. ना. ह. जोशी समाजमंदिर’ बांधण्यात आले आहे.  

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
कै.वैद्य ना.ह.जोशी समाज

नागरी सुविधा संपादन

गावामध्ये रास्त भाव धान्य दुकान आहे.

१९६८ साली गावात वीज पुरवठा सुरू झाला.१९८९ सालापासून येथे पाणी योजना कार्यान्वित झाली.[]

शाळा संपादन

गावामध्ये पूर्व प्राथमिक शाळा कासे क्रमांक १, आणि प्राथमिक शाळा कासे क्र. २ या शाळा आहेत.[]

ग्रामपंचायत संपादन

कासे गाव कासे-असावे ग्रुप ग्राम पंचायतीत येते.[]

जवळपासची गावे संपादन

कळंबुशी

संदर्भ संपादन

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/