सिरसगाव मंडप

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १२:०७, ३ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

सिरसगाव मंडप

स्थान संपादन

सिरसगाव मंडप हे गाव महाराष्ट्र राज्यातल्या जालना जिल्ह्यातील भोकरदन या तालुक्यात आहे. हे गाव भोकरदन - हसनाबाद रस्त्यावर सिरसगाव पाटी पासून 2 km अंतरावर वसलेले आहे. औरंगाबाद व "जालना येथे जवळचे रेल्वे स्टेशन आहे.

लोकजीवन संपादन

गावात प्रामुख्याने हिंदू धर्मीय आहेत. गावातील 80 टक्के लोकसंख्या ही मराठा जातीची आहे.बहुतांश लोकसंख्या सहाने हे आडनाव असलेली आहे.

प्रशासन संपादन

इथला कारभार हा ग्रामपंचायतीमार्फत चालतो. हे गाव भोकरदन पोलीस स्टेशनाच्या हद्दीत येते. तहसील कार्यालय भोकरदन येथे आहे.

शिक्षण संपादन

गावात प्राथमिक व माध्यमिक व्यवस्था आहे. पुढील शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते.

आरोग्य संपादन

गावात महाराष्ट्र शासनाचे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. तसेच खाजगी इस्पितळही आहे.

व्यवसाय संपादन

येथील जनजीवन हे शेती व्यवसायावर अवलंबून आहे. काही लोक इतर व्यवसाय करतात. येथे जालना जिल्हा मध्यवर्ती बँक व महाराष्ट्र गोदावरी ग्रामीण बँक या बँका भोकरदन येथे आहेत.