अरुण बालकृष्ण कोलटकर
साचा:माहितीचौकट साहित्यिक अरुण बालकृष्ण कोलटकर (नोव्हेंबर १, १९३२ - सप्टेंबर २५, २००४) हे मराठी, हिंदी, व इंग्रजी भाषांत कविता करणारे भारतीय कवी होते.
परिचय संपादन
कोलटकरांचा जन्म कोल्हापुरात झाला. त्यांचे शालेय शिक्षण तेथील राजाराम माध्यमिक विद्यालयात झाले. मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे पदवीधारक असलेले कोलटकर एक उत्तम ग्राफिक्स डिझायनर व जाहिरात क्षेत्रातील अत्यंत यशस्वी कलादिग्दर्शक होते. १९५०–१९६० च्या दशकांत त्यानी लिहिलेल्या कविता या मुंबईतील विशिष्ठ बोली मराठीतल्या असून त्यात मुंबईत आलेल्या निर्वासितांच्या व गुन्हेगारांच्या जीवनाचे दर्शन घडते. उदाहरणार्थ, मै भाभीको बोला / क्या भाईसाबके ड्यूटीपे मै आ जाऊ? / भड़क गयी साली / रहमान बोला गोली चलाऊॅंगा / मै बोला एक रंडीके वास्ते? / चलाव गोली गांडू.[१]
प्रकाशित काव्यसंग्रह संपादन
मराठी संपादन
- अरुण कोलटकरच्या कविता (१९७७)
- चिरीमिरी (२००४)
- द्रोण (२००४)
- भिजकी वही (२००४)
- अरुण कोलट्करच्या चार कविता
इंग्रजी संपादन
- कलेक्टेड पोएम्स इ्न इंग्लिश
- जेजुरी
- काळा घोडा पोएम्स
- द बोटराईड ॲन्ड अदर पोएम्स
- सर्पसत्र
पुरस्कार संपादन
- २००५चा साहित्य अकादमी पुरस्कार
- कुसुमाग्रज पुरस्कार
- २००५चा बहिणाबाई पुरस्कार
- १९७६चा राष्ट्रकुल काव्य पुरस्कार
इतर संपादन
- अरुण कोलटकर हे ’शब्द’ या लघु नियतकालिकाचे रमेश समर्थ व दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्याबरोबर सहसंपादक होते.
बाह्य दुवे संपादन
साचा:मराठी साहित्यिक साचा:मराठी कवी
- ↑ अरुण कोलटकर : पहिल्या कविता, लेख, समीक्षेचा अंतःस्वर. देवानंद सोनटक्के पद्मगंधा प्रकाशन पुणे, २०१२