गोवा मुक्ती दिन
साचा:Infobox holiday गोवा मुक्ती दिन (पोर्तुगीज:Dia da libertação de Goa) (कोकणी:गोंय मुक्ति दिस) गोवा मुक्ती दिन, भारतामध्ये दरवर्षी १९ डिसेंबर रोजी साजरा केला जातो.[१] यादिवशी भारतीय सेनेनं पोर्तुगीजांपासून गोवा मुक्त केला. तसेच या दिवशी भारत युरोपियन राजवटीपासून पूर्णपणे मुक्त झाला होता.[२][३]
गोवा, दमण आणि दीव मुक्ती दिन संपादन
साचा:मुख्य प्राचीन भारतातील गोवा, दमण आणि दीव तसेच दादरा आणि नगर हवेली या भागावर जवळपास ४५० वर्षे राज्य होते. इ.स. १७५२ सालापर्यंत आफ्रिका खंडाच्या दक्षिणेपासून आग्नेय आशियापर्यंत, अश्या हिंदी महासागरातील सर्व पोर्तुगीज वसाहतींना पोर्तुगीज भारत या संज्ञेने उल्लेखले जाई.[४]
भारतीय नौदल जहाज गोमंतक येथील युद्ध स्मारक हे भारतीय नौदलाने अंजेदिवा बेट, गोवा आणि दमण आणि दीव प्रदेशांच्या मुक्तीसाठी हाती घेतलेल्या “ऑपरेशन विजय” मध्ये १९ डिसेंबर १९६१ रोजी आपले प्राण बलिदान देणाऱ्या सात तरुण शूर खलाशी आणि इतर जवानांच्या स्मरणार्थ बांधले गेले.[५]
गोवा मुक्ती दिनानिमित्त दर वर्षी गोव्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.[६]