घोषा कक्षीवती ही प्राचीन वैदिक भारतातील स्त्री होती.[]ती दीर्घतमस या ऋषीची नात तर काक्षिवत याची कन्या होती. []या दोघांनीही अश्विन कुमारांच्या (दैवी वैद्यांचे जुळे) कौतुकाची सूक्ते रचली आहेत.[]

रचना संपादन

ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील दोन सूक्ते (क्र. ३९ व ४०) ही घोषाने रचल्याने मानले जाते. []पहिल्या सूक्तात अश्विनांची स्तुती आहे तर दुसऱ्या सूक्तात तिच्या वैयक्तिक इच्छांचा उल्लेख आहे.

सूक्तांनुसार घोषाला कुष्ठरोगामुळे विद्रूपता आलेली होती.[] उतारवयात अश्विन कुमारांनी तिची व्याधी दूर करून तिला आरोग्य, तारुण्य आणि लावण्य दिले. त्यामुळे तिचा विवाह होऊ शकला असे []

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

  1. साचा:स्रोत पुस्तक
  2. साचा:स्रोत पुस्तक
  3. "Vedic Women: Loving, Learned, Lucky!". Retrieved 2012-11-04.
  4. साचा:स्रोत पुस्तक
  5. Mahendra Kulasrestha (2006). The Golden Book of Rigveda. Lotus Press. p. 221. ISBN 978-81-8382-010-3.
  6. Vettam Mani (1975). Puranic encyclopaedia. Motilal Banarsidass. p. 291. ISBN 978-0-8426-0822-0.