Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
जहाँआरा बेगम - मराठीपिडिया

जहॉंआरा बेगम (२३ मार्च, १६१४ - १६ सप्टेंबर, १६८१) ही मुघल सम्राट शाह जहान आणि मुमताज महल यांची कन्या होती. ही औरंगजेबाची थोरली बहीण होती. दिसायला अतिशय सुंदर असलेल्या जहानआराला अरबी व फारसी भाषा येत होत्या. वडिलांची ती अतिशय लाडकी होती. ती वडिलांची देखभाल करीत असे, राज्याविषयी सल्लेही देत असे.शाह जहानला ती विशेष प्रिय असल्याचे सांगितले जाते.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
१६३५मध्ये काढलेले जहॉंआरा बेगमचे चित्र

सम्राट अकबराने राजकन्यांविषयी केलेल्या नियमांनुसार तिचे लग्न झालेले नव्हते.

साचा:बदल औरंगजेब व तिचे संबंध कधीच सौहार्दाचे नव्हते. तिचा जीव दाराशुकोहवर जास्त होता. शाहाजहाननंतर तो मोगल साम्राज्याचा वारस बनावा, यासाठी तिचा प्रयत्‍न होता; पण औरंगजेबाने दाराशुकोहचा काटा काढला आणि मोगल बादशहा बनण्याचा मार्ग मोकळा केला.

जहानआराने आयुष्यात अनेक दुःखे भोगली. जवळच्या माणसांचे मृत्यू पाहिले; पण मोगल साम्राज्यासाठी ती कायम कणखर राहिली. प्रियकराविषयी तिच्या मनातील भावना तिने कधीच व्यक्त केल्या नाहीत.

मोगल राजघराण्यातील स्त्रियांप्रमाणेच ती अविवाहित राहिली.

जहान‍आरा बेगमविषयी पुस्तके आणि दृश्यमाध्यमे संपादन

  • जहानआराची कहाणी आन्द्रिया वुतेनशोएन या पाश्चात्य लेखिकेने कादंबरीरूपात लिहिली आहे. तिचे ’जहानआरा बेगम - कहाणी मुघल शाहजादीची’ या नावाचे मराठी रूपांतर सुहासिनी देशपांडे यांनी केले आहे. शाहजादी जहानआराची घुसमट, तडफड, वेदना असहाय्यता व उत्कट प्रेमभावना या कादंबरीतून व्यक्त होते.
  • पाकिस्तानी दूरचित्रवाणीवर ’हम सितारे’ या कार्यक्रमात जहान-आरा-बेगम ही दैनंदिन मालिका येत असे. हिचे १००हून अधिक एपिसोड झाले होते.
  • जहान आरा (हिंदी चित्रपट, १९६४, नायिका माला सिन्हा)
  • ताजमहाल : ॲन इटर्नल लव्ह स्टोरी (हिंदी चित्रपट, २००५, नायिका मनीषा कोईराला)
  • An Omen for a Princess (इंग्रजी कादंबरी, लेखिका - जीन बॉथवेल)
  • Beneath a Marble Sky, (इंग्रजी कादंबरी, लेखक - जॉन शॉर्स)
  • Jahanara: Princess of Princesses, India - 1627 : The Royal Diaries या ग्रंथ मालिकेतले एक इंग्रजी पुस्तक, लेखिका - कॅथरीन लास्की.
  • Shadow Princess (इंदू सुंदरेशन यांची इंग्रजी कादंबरी - २०१०)

साचा:विस्तार