शाह जहान

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट राज्याधिकारी शाहजहान, जन्मनाव खुर्रम, ( जानेवारी ५, इ.स. १५९२; लाहोर, पंजाब (पाकिस्तान) - जानेवारी २२, इ.स. १६६६; आग्रा;) हा मुघल सम्राट व औरंगजेबाचा पिता होता. मारवाडाचा राजा उदयसिंह याची कन्या मानमती उर्फ जगत गोसई ही शहाजहानाची आई होती व तिचा विवाह जहांगिराशी इ.स.१५८६ साली झाला. तूळ रास राशिमंडळात असताना शहाजहानचा जन्म झाला. या नक्षत्रात जन्मलेले अर्भक महान मानले जात असल्यामुळे दरबारी फलज्योतिषांनी त्यांची कुंडली तयार करून त्याचे भवितव्य अतिशय उज्ज्वल असल्याचे भाकीत वर्तवले होते. खुर्रम या नावाचा अर्थ आनंददायी असा होतो. जहांगीर या आपल्या पित्याचा उत्तराधिकारी म्हणून शहा ज्यांनी राज्यकारभार सांभाळला तो कला आणि स्थापत्याचा प्रेमी होता जहांगीर यांनीदेखील कलाकारांना व कलेला मोठा राजाश्रय दिला जांगिर बादशहा हा चित्रकलेचा उत्तम पारखी होता त्याचा हा वारसा पुढे शहाजान याने पुढे नेला मगल सम्राट मध्ये शहाजानने जहांगिराचे धोरण पुढे नेताना मुघल साम्राज्याचा मोठा विस्तार केला अनेक प्रांत त्याने जिंकून घेतले स्थापत्यकलेची त्याला विशेष आवड होती त्याने आपल्या कार्यकाळात अनेक सुंदर इमारती बांधल्या ताजमहल ही त्याने बांधलेली अप्रतिम अशी स्थापत्याची कलाकृती आहे

बालपणाची चार वर्ष आणि चार महिने संपल्यानंतर खुर्रमाचे राजपुत्र म्हणून शिक्षण सुरू झाले. तुर्की भाषेबरोबर नेमबाजी, घोडेस्वारी, तलवारबाजी यांत शहाजहानाला रुची होती साचा:संदर्भ हवा. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २१ मार्च, इ.स. १६०७ रोजी शहाजहानाला पहिली लष्कर मनसब देण्यात आली.[१]

संदर्भ व नोंदी

साचा:संदर्भयादी