दौंड रेल्वे स्थानक
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:मुंबई चेन्नई मार्ग दौंड जंक्शन हे पुणे जिल्ह्याच्या दौंड शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. मुंबई-पुणे-वाडी ह्या मुख्य मार्गावर असलेल्या दौंडमधून मनमाडकडे जाणारा फाटा फुटतो. ह्यामुळे पुण्याहून उत्तर व दक्षिणेकडील प्रमुख शहरांकडे जाणाऱ्या गाड्या दौंडमधूनच धावतात. पुणे उपनगरी रेल्वे सेवा दौंडपर्यंत चालवण्याची मागणी गेले अनेक वर्षे स्थानिक प्रवाशांकडून केली जात आहे.
रोज सुटणाऱ्या एक्सप्रेस गाड्या संपादन
- पुणे – जम्मू तावी झेलम एक्सप्रेस
- पुणे – हावडा आझाद हिंद एक्सप्रेस
- पुणे – पाटणा एक्सप्रेस
- पुणे – सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस
- पुणे सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस
- हजरत निजामुद्दीन – वास्को द गामा गोवा एक्सप्रेस
- कोल्हापूर – गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस
- नवी दिल्ली – बंगळूर कर्नाटक एक्सप्रेस
- मुंबई – चेन्नई एक्सप्रेस
- मुंबई – चेन्नई मेल
- मुंबई – हैदराबाद हुसेनसागर एक्सप्रेस
- मुंबई – हैदराबाद एक्सप्रेस
- मुंबई – सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस
- मुंबई – बंगळूर उद्यान एक्सप्रेस
- कुर्ला – कोइंबतूर एक्सप्रेस
- मुंबई – कन्याकुमारी एक्सप्रेस