मनमाड रेल्वे स्थानक

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:कल्याण-भुसावळ रेल्वेमार्ग मनमाड रेल्वे स्थानक उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मध्य रेल्वेच्या मनमाड-सिकंदराबाद मार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक असून अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या येथे थांबतात.

हे स्थानक दक्षिण मध्य रेल्वेच्या मुंबई-नागपूर-हावडा मार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक असून लांब पल्ल्याच्या जवळजवळ सगळ्या रेल्वेगाड्या येथे थांबतात. येथून दौंडकडे आणि पूर्णाकडे जाणारे लोहमार्गही आहेत. वसई-दिवा लोहमार्ग तयार होईपर्यंत पश्चिम व उत्तर भारतातून दक्षिणेकडे जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या भुसावळ-मनमाड-दौंडमार्गे जात असत. मनमाड-इंदूर हा नवा रेल्वेमार्ग बांधून पूर्ण झाल्यानंतर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचे अंतर कमी होईल.

इतिहास

भारतातील पहिला रेल्वेमार्ग १९५३मध्ये कार्यान्वित झाल्यानंतर हा मार्ग कोलकात्याकडे झपाट्याने वाढविण्यात आला. १८५४ च्या मे महिन्यात कल्याण, १८६० मध्ये भुसावळ तर १८६७मध्ये हा मार्ग नागपूर रेल्वे स्थानकला जाउन पोचला.[१][२] मनमाड रेल्वे स्थानक १८६६मध्ये बांधून कार्यान्वित झाले. सुमारे शंभर वर्षांनंतर १९६८साली या स्थानकातील मार्गाचे विद्युतीकरण झाले.[३]

येथे सुरुवात/शेवट होणाऱ्या गाड्या

गाडी क्र. गाडी नाव गंतव्यस्थान
१२१०९ / १२११० पंचवटी एक्सप्रेस मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस
१२११७ / १२११८ गोदावरी जलद एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस
१७०६३ / १७०६४ अजिंठा एक्सप्रेस सिकंदराबाद
१७६८७ / १७६८८ मराठवाडा एक्सप्रेस धर्माबाद
२२१०१ / २२१०२ मनमाड लोकमान्य टिळक टर्मिनस राज्यराणी एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस

साचा:संदर्भनोंदी