नागपूर रेल्वे स्थानक

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
नागपूर रेल्वे स्थानकाचे मुख्य प्रवेशद्वार

नागपूर जंक्शन हे भारत देशाच्या नागपूर शहरामधील मुख्य रेल्वे स्थानक आहे. नागपूर शहर भौगोलिक दृष्ट्या भारताचे केंद्र असल्यामुळे नागपूर हे देशामधील सर्वात महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक आहे. भारतीय रेल्वेचे पूर्व-पश्चिम धावणारा मुंबई-कोलकाता व उत्तर धावणारा दिल्ली-चेन्नई हे सर्वात वर्दळीच्या मार्गांपैकी दोन रेल्वेमार्ग नागपूरमध्ये भेटतात. तसेच उत्तर भारतामधून दक्षिणेकडे जाणाऱ्या बव्हंशी रेल्वेगाड्या नागपूरमधून जातात. नागपूर रेल्वे विभागाचा मध्य रेल्वेदक्षिण पूर्व मध्य रेल्वे ह्या दोन क्षेत्रांमध्ये समावेश होतो.

१८६७ सालापासून चालू असलेल्या नागपूर स्थानकावर १० फलाट असून दररोज सुमारे १६० गाड्या येथे थांबतात. नागपूरमध्ये मिळणारे सर्व रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झाले आहे.

इतिहास

हे अतिशय जुने म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटिश कालावधीत दि.१५ जानेवारी १९२५ रोजी सर फ्रॅंक यानी उदघाटण केलेले रेल्वे स्टेशन आहे.[१] नागपूर हे भारताचे महत्त्वाचे शहर आहे. १८६७ मध्ये नागपुर रेल्वे सुरू झाली. सन १८८१ मध्ये छत्तीसगड मार्गे महत्त्वाचे कोलकता शहाराशी हे शहर जोडले. आता असणाऱ्या रेल्वे स्टेशनचे पूर्व बाजूला पूर्वीचे रेल्वे स्टेशन होते.

सेवा

पॅसेंजर, एक्सप्रेस, मेल, दुरान्तो, राजधानी, गरीब रथ अशा ट्रेनचा समावेश असणाऱ्या आणि देशाचे विविध ठिकाणी जाणाऱ्या एकूण २४२ ट्रेन नागपूर रेल्वे स्टेशनवर थांबतात.[२] यापैकी ५३ दररोज आणि २६ तेथूनच मार्गस्त होणाऱ्या ट्रेन आहेत. साधारण १.६ लाख प्रवाशी येथे ये जा करतात. येथे ८ ब्राड गेज आणि २ मीटर गेजचे १० फ्लॅट फॉर्म आहेत. याचे १३ ट्रॅक आहेत. याचे कोड नाव NGP आहे. हे स्टेशन मध्य रेल्वेच्या दक्षिण पूर्व विभागात आहे.[३] येथा पार्किंग व्यवस्था आहे.

संपर्क

नागपूर हे ख्यातनाम आहे ते केवळ महाराष्ट्राचे द्वितीय राजधानीचे शहर आहे म्हणून किंवा पर्यटक स्थळं आहे म्हणून नाही तर त्याची ख्याती ते एक भारत देशाचे मध्यवर्ती ठिकाण आहे म्हणून आणि ते व्यावसायिक दृष्टीने राज्यासाठी महत्त्वाचे आहेच पण देशासाठीही आहे. तेथेच हे नागपूर रेल्वे स्टेशन आहे.[४]

विकास

भारत देशातील २२ रेल्वे स्टेशनचा आंतरराष्ट्रीय पद्दतीने विकास करून दर्जा वाढविण्याचा प्रस्ताव झालेला आहे त्यात नागपूर रेल्वे जंक्शन स्टेशनचा समावेश आहे.[५] हे काम सार्वजनिक भागीदारी कंपनी आणि मध्य रेल्वे एकत्रितपने करताना सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता, यावर अधिक भर देण्यात प्रयत्न शील आहे. नजीकचे अजनी रेल्वे स्टेशनचे टर्मिनस बनवून लांब पल्याच्या ट्रेन तेथून वळविण्याचे धोरण आहे.[६] येथेच बोगी ठेवण्याची व्यवस्था करण्याचाही प्रस्ताव आहे. नागपुर ही उपराजधानी असल्यामुळे येथून जुनी दिल्ली साठी उपराजधानी एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी आहे. याशिवाय नागपूरमध्ये लोकल रेल्वे स्टेशन करण्याचीही योजना आहे त्यात अजणी, इतवारी, कलमना आणि गोधणीचा समावेश आहे. नागपूर ते अजणी या रेल्वे मार्गाचे अंतर ३ की.मी.आहे की जे भारतीय रेल्वेचा सर्वात कमी अंतर असणारा मार्ग आहे. मूलतः रेल्वे चालकांना अजणी येथील वर्कशॉप पर्यन्त जाण्याची ही व्यवस्था आहे.

मार्ग

हावडा- नागपूर -मुंबई, दिल्ली- चेन्नई, नागपूर- हैदराबाद , नागपुर -बिलासपुर सेक्शन, नागपूर- नगभीर NG आणि नागपूर- छिंदवाडा NG हे मार्ग आहेत.

नागपूरमधून सुटणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या

संदर्भ

साचा:संदर्भयादी साचा:महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके