मेधा पाटकर
मेधा पाटकर (जन्म : १-डिसेंबर-इ.स. १९५४) या नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या आहेत.
प्रारंभिक आयुष्य संपादन
मुंबई येथे जन्मलेल्या मेधा पाटकर यांचे पालक सामाजिक व राजकीयदृष्ट्या जागरूक होते. त्यांच्या वडिलांनी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग घेतला होता. आई स्वादर नावाच्या स्त्रियांच्या प्रश्नाला वाहिलेल्या संस्थेची कार्यकर्ती होती. त्यांच्या पालकांच्या विचारांचा मेधा पाटकर यांच्या जडणघडणीवर खोल परिणाम झाला.[१]
पाटकर यांनी टाटा सामाजिक शास्त्र संस्थेतून एम.ए.ची पदवी मिळवली.(TISS). त्यानंतर सात वर्षे मुंबईतील विविध स्वयंसेवी संस्थांमधून काम केले. त्यांनी काही काळ टाटा सामाजिक शास्त्र संस्थेत शिक्षकाचे कामही केले.[२]
उपोषण संपादन
नर्मदा बचाव आंदोलन संपादन
नर्मदा बचाव आंदोलन आणि जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय या चळवळीत संजय संगवई हे मेधा पाटकर यांचे निकटवर्ती सहकारी होते.
इतर कार्य/आंदोलने संपादन
मेधा पाटकर यांना मिळालेले पुरस्कार संपादन
- मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार
- राइट लाइव्हलिहुड ॲवॉर्ड, स्वीडन - १९९१. (पर्यायी नोबल पारितोषिक) ( नर्मदा बचाव आंदोलनासाठी बाबा आमटे यांच्या सोबत संयुक्तपणे )
- दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
- महात्मा फुले पुरस्कार
- मानवी हक्क रक्षक पुरस्कार - ॲम्नेस्टी इंटरनॅशनल
- यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी येथील जैताई देवस्थानतर्फे जैताई मातृगौरव पुरस्कार (२७-९-२०१७)
टीका संपादन
केवळ नर्मदा बचाव आंदोलन केले म्हणून त्यांच्यावर गुजराती समाजाविरुद्ध आकस असल्याचा वाह्यात आरोप केला जातो.साचा:संदर्भ हवा