मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Infobox award

मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार साताऱ्याच्या संबोधी प्रतिष्ठानातर्फे साहित्य, कला व परिवर्तनाची चळवळीसह विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिलांना देण्यात येतो.[१] हा पुरस्कार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाबाई आंबेडकर यांच्या स्मरणार्थ इ.स. १९९८ पासून दरवर्षी ६ डिसेंबर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी प्रदान केला जातो. ५,००० रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.[२]

पुरस्कार प्राप्त व्यक्ती

पुरस्कार विजेत्या महिला खालीलप्रमाणे आहेत.[१]
वर्ष व्यक्ती संदर्भ
इ.स. १९९८ ज्योती लांजेवार [३]
इ.स. १९९९ पुष्पा भावे [४]
इ.स. २००० रजिया पटेल
इ.स. २००१ बेबी कांबळे
इ.स. २००२ यमुनाबाई वाईकर [५]
इ.स. २००३ प्रज्ञा पवार
इ.स. २००४ ऊर्मिला पवार
इ.स. २००५ सिसिलिया कार्व्हालो
इ.स. २००६ इंदिरा आठवले
इ.स. २००७ तीस्ता सेटलवाड
इ.स. २००८ हिरा बनसोडे [६]
इ.स. २००९ प्रतिमा जोशी
इ.स. २०१० उल्का महाजन
इ.स. २०११ सुशीला मूल-जाधव
इ.स. २०१२ गेल ऑम्वेट [७]
इ.स. २०१३ मेधा पाटकर
इ.स. २०१४ संध्या नरे-पवार
इ.स. २०१५ मुक्ता दाभोलकर
इ.स. २०१६ मुक्ता मनोहर [८]
इ.स. २०१७ आशालता कांबळे
इ.स. २०१८ निशा शिवूरकर [९][१०]
इ.स. २०१९ शिल्पा कांबळे [११][१२]

हे सुद्धा पहा

संदर्भ

साचा:संदर्भयादी

साचा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर