साचा:माहितीचौकट साहित्यिक शिल्पा कांबळे या भारतीय स्त्रीवादी व आंबेडकरवादी मराठी भाषेतील लेखिका आहेत. त्यांनी निळ्या डोळ्यांची मुलगी ही कादंबरी लिहिलेली आहे.[] तसेच त्यांनी भारतात गोमांसावर झालेल्या बंदीनंतर बिर्याणी नावाचे नाटक बनवले ज्यात एक मुसलमान आणि एक दलित अशा दोन स्त्रियांची कथा आहे.

सुरुवातीचे जीवन व शिक्षण संपादन

शिल्पा कांबळे या मुंबई येथील निवासी आहेत. त्यांचे मूळ गाव डाकू निमगाव (ता. कर्जत जि. अहमदनगर) येथील तसेच आजोळ मैदान मातकुळी (ता. आष्टी जि. बीड) हे आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण विक्रोळी मुंबई येथील महानगरपालिका शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण विकास हायस्कूल येथून तर महाविद्यालयीन शिक्षण रुईया कॉलेजमधून झाले असून सांख्यिकी विषयात त्या बी.एस्सी. आहेत.

कारकीर्द संपादन

कांबळे सेंट्रल गव्हर्मेंट स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा उत्तीर्ण होऊन आयकर विभागात आयकर अधिकारी पदावर कार्यरत आहेत.

साचा:संदर्भनोंदी

बाह्य दुवे संपादन