साचा:माहितीचौकट पदाधिकारी

वर्षा एकनाथ गायकवाड ह्या एक भारतीय राजकारणी व माजी प्राध्यापिका आहेत. २०१९ साली त्या महाराष्ट्राचे शालेय शिक्षण विभागाच्या कॅबिनेट मंत्री झाल्या. त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर धारावी विधानसभा मतदारसंघातून सन २००४पासून सतत चार वेळा निवडून आल्या आहेत.[][]

प्राध्यापक म्हणून त्यांनी पाच वर्षे काम केलेले आहे. त्या महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री असून राज्यातील पहिल्याच महिला शालेय शिक्षण मंत्री आहेत.[] काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या त्या कन्या असून त्यांना वडिलांच्या राजकारणाचा वारसा आहे. २०१९ मध्ये गायकवाड या चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या. २०१० ते २०१४ या काळात त्या महिला व बालकल्याण विकास खात्याच्या मंत्री होत्या.[] ३ फेब्रुवारी १९७५ रोजी, त्यांचा जन्म महाराष्ट्रातील एका बौद्ध कुटुंबात झाला होता.[][]

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी