संजय वाघ
संजय वाघ हे एक मराठी लेखक, कवी, बालसाहित्यिक आणि पत्रकार आहेत. त्यांच्या 'जोकर बनला किंगमेकर' या किशोर कादंबरीला २०२१ साली साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार घोषित झाला आहे.[१]
कारकीर्द संपादन
संजय वाघ हे गेल्या ३१ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत असून सध्या ते लोकमतवृत्तपत्रसमूहामध्ये उप वृत्तसंपादक म्हणून कार्यरत आहेत.
साहित्यसंपदा संपादन
- जोकर बनला किंगमेकर
- गाव मामाचं हरवलं
- बेडकाची फजिती
- गोष्ट बोलक्या पोपटाची
- २६/११ चे अमर हुतात्मे
- गंध माणसांचा
- डॉ. श्रीपाल सबनीस प्रणीत प्रतिभा संगम
- ऊन सावल्या
पुरस्कार संपादन
- 'जोकर बनला किंगमेकर' या किशोर कादंबरीसाठी साहित्य अकादमी, नवी दिल्लीचा २०२१ सालचा बालसाहित्य पुरस्कार घोषित