Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
हेमचंद्र विक्रमादित्य - मराठीपिडिया

हेमचंद्र विक्रमादित्य

हेमू उर्फ सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य ऊर्फ हेमचंद्र भार्गव (इ.स. १५०१ - इ.स. १५५६) हा इ.स.च्या १६ व्या शतकातील उत्तर भारतातला एकमेव हिंदू सम्राट होता. तो राजस्थानातल्या अलवार जिल्ह्यामधील एका लहान गावातील ब्राह्मण पुरोहिताचा मुलगा होता. एक मीठ विक्रेता म्हणून जीवनाला सुरुवात केलेला हेमू, आपल्या कर्तबगारीने सूरी वंशाच्य़ा आदिल शाह सूरीचा सेनापती व प्रधानमंत्री या पदांपर्यंत पोहोचला.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
हेमचंद्र विक्रमादित्य

उत्तर हिंदुस्तानात पंजाबपासून बंगालपर्यंत त्याने अफगाण बंडखोर, हुमायूँअकबराच्या मुघल फौजा यांच्याशी सुमारे २२ लढाया एकदाही पराभूत न होता जिंकल्या. ऑक्टोबर ७ इ.स. १५५६ साली त्याचा ’सम्राट विक्रमादित्य’ या पदवीसहित दिल्लीच्या सिंहासनावर राज्याभिषेक करण्यात आला. सुमारे ३५० वर्षांनंतर त्याने हिंदू साम्राज्याची थोड्या काळासाठी का होईना, पुनःस्थापना केली. त्याने आपल्या नावाने नाणीही प्रचारात आणली होती. मध्ययुगीन भारताचा नेपोलियन अशीही पदवी त्याला देण्यात येतेसाचा:संदर्भ हवा.

मात्र त्यानंतर लगेचच झालेल्या पानिपतच्या दुसऱ्या लढाईत केवळ दुर्दैवाने अकबराच्या मुघल सैन्याकडून हेमूच्या सैन्याचा पराभव झाला. हेमूला पकडून त्याचा शिरच्छेद करण्यात आला[]. हेमूचे समर्थक व हजारो हिंदूंची कत्तल अकबराच्या मुघल सैन्याकडून करण्यात आलीसाचा:संदर्भ हवा.


अधिक वाचन संपादन

  • भारद्वाज, के.के., "हेमू - नेपोलियन ऑफ मेडिएव्हल इंडिया, मित्तल पब्लिकेशन्स, नवी दिल्ली, पृ. ५९-६० (इंग्लिश मजकूर)
  • "हिमू - अ फरगॉटन हिंदू हीरो", भारतीय विद्या भवन, पृ. १०० (इंग्लिश मजकूर)
  • जे.एन. सरकार, "मिलिटरी हिस्टरी ऑफ इंडिया", पृ. ६७ (इंग्लिश मजकूर)

साचा:विस्तार