विष्णु नरहरी खोडके

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:१२, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट व्यक्ती

विष्णू नरहरी खोडके (२ मार्च १९०० – ४ मार्च १९५९) हे भारतीय वकीलराजकारणी होते. ते ब्रिटिश राजवटीच्या काळातील महाड शहर व कुलाबा जिल्हा (आजचा रायगड जिल्हा) परिसरातले होते. त्यांनी महाडच्या राजकिय, वकिली व सामाजिक क्षेत्रांत योगदान दिले आहे. त्यांना खोडके वकील म्हणूनही ओळखत जाते. खोडके हे महाड नगरपालिकेचे अध्यक्षपदी इ.स. १९३१-१९४७ या कालावधित कार्यरत होते.

प्रारंभिक जीवन व शिक्षण संपादन

खोडके यांचा जन्म इ.स. २ मार्च १९०० रोजी कुलाबा जिल्यातील (आजचा रायगड) महाड येथे झाला. त्यांचे वडील नरहरी तात्याबा खोडके हे महाड मधील ड्रायफ्रूट्स व मसाले व्यापारी होते.

खोडके यांचे प्राथमिक शिक्षण महाड मधे झाले. जॉन एल्फिन्स्टन हायस्कुल, अलिबाग मधून ते मॅट्रिक झाले. उच्च शिक्षणासाठी मुंबईला जाऊन विल्सन कॉलेज, मधून १९२१ मधे त्यांनी बी.ए.(ऑनर्स) पदवी मिळवली. गवर्नमेंट लॉ स्कूल, मुंबई येथुन १९२४ मधे एल.एल.बी. पदवी प्राप्त केली.[]

इसवी सन १९२६ च्या "बॉम्बे युनिवर्सिटी कॅलेंडर" या पुस्तकात बुद्धिमान विद्यार्थी म्हणुन खोडके यांचा उल्लेख केला गेला होता.[]

कारकीर्द संपादन

साचा:बदल

ॲड.खोडके यांनी १९२६ पासुन महाड़ न्यायालय व कुलाबा जिल्हा न्यायालय ,अलिबाग मध्ये वकिल म्हणुन कारकीर्द सुरू केली.आपल्या हुशारिने काहि अवघड केसेस जिंकुन थोड्याच अवधित ते महाड कुलाबा परिसरातले अव्वल वकिल बनले.कोर्टात न्यायाधिशांसमोर खटल्याचे मुद्देसुद सादरिकरण व धाडसी वक्तृत्व शैली ही ॲड. खोडके यांची वैशिष्ट्ये होती.साचा:संदर्भ

१९२९ मधे एक बहुचर्चित खटला जिंकणे त्यांच्या कारकीर्दितील मैलाचा दगड ठरला.ॲड. खोडके यांनी जंजिरा संस्थानचे नवाब मोहम्मद खान (दुसरे) यांच्या विरुद्ध एका गरिब शेतकर्याच्या बाजुने खटला जिंकला होता. साचा:संदर्भ

याच दरम्यान त्यांनी काँग्रेस मधे प्रवेश केला.वकिली क्षेत्रात दबदबा व महाडच्या राजकिय क्षेत्रात प्रभावी कामगिरी यामुळे १९३१ मधे त्यांना महाड काँग्रेस कमिटीचे प्रेसिडेंट म्हणुन निवडले गेले.[]

त्यांच्या नेतृत्वाखाली १९३१ च्या नगरपालिका निवडणुकांत काँग्रेसला बहुमत मिळाले व ॲड. खोडके यांना महाड नगरपालिकेचे प्रेसिडेंट म्हणुन निवडले गेलेे.त्यांनी हे पद १९४७ पर्यंत भुषविले.[]

हि दोन्ही पदे भुषविताना खोडके वकिल यांनी काँग्रेसची धोरणे व स्वातंत्र्य आंदोलने महाड मधे यशस्वी पणे राबविली.साचा:संदर्भ

ॲड. खोडके हे क्षत्रिय नामदेव शिंपी समाजात जन्मले होते.सदर समाजाच्या नामदेव शिंपी समाज संस्थाचे प्रेसिडेंट पदी त्यांना निवडण्यात आले होते.हे पद भूषविताना त्यांनी सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले.[]

ॲड. खोडके यांना महाडच्या विकासाचे आद्यपुरूष मानले जाते.महाडमधे त्यांनी जल पुरवठा योजना,नविन रस्ते,वीज यांसारख्या मूलभूत सुधारणा करून महाडकरां साठी इतरहि उपयोगी योजना राबविल्या व महाड शहराच्या विकासाला प्रथमच चालना मिळवुन दिली.साचा:संदर्भ

एक ख्यातनाम वकिल,महाड़ नगरपालिकेचे प्रेसिडेंट,महाड़ काँग्रेस कमिटीचे प्रेसिडेंट, नामदेव शिंपी समाज संस्थेचे प्रेसिडेंट ही पदे भूषविताना त्यांनी राजकिय,वकिली व सामाजिक क्षेत्रांत केलेल्या अष्टपैलू कार्यामुळे, ॲड. खोडके यांचे नाव ब्रिटिशां कडुन १९४१ सालच्या"हूज हू इन इंडिया,बर्मा एंंड सिलोन" (Who's Who in India Burma and Ceylon-1941) या पुस्तकात सामिल केले गेले.[] "हूज हू" ही जगभरातील उल्लेखनीय व्यक्तींची माहिती प्रकाशित करणारी पुस्तक श्रृंखला आहे.

ॲड. खोडके यांनी दोन मराठी पुस्तके लिहिली होती.१) शिक्षण : आधुनिक भारतीयांची मूलभूत गरज व २) रायगडास भेेंट.[][]

डॉ. आंबेडकरांना मानपत्र संपादन

महाड काँग्रेस कमिटी व महाड नगरपालिकेचे अध्यक्ष असल्याने महात्मा गांधीडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते.[] १९२७ च्या चवदार तळे सत्याग्रहमनुस्मृती दहन या घटनानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाड मध्ये येत असत, कारण महाड हे दलितांसाठीच्या आंदोलनांचे एक केंद्र बनले होते. १९ मार्च १९४० रोजी खोडके यांनी महाड नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणुन डॉ. आंबेडकर यांच्या सन्मानार्थ जाहिर कार्यक्रम आयोजित करून डॉ. आंबेडकरांना "मानपत्र" देऊन गौरविले. डॉ. आंबेडकर यांनी उत्तरादाखल एक भाषण केले.[] खोडके यांनी दिलेले हे मानपत्र व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण महाराष्ट्र सरकार कडुन प्रकाशित डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे "खंड १८, भाग २ या मध्ये उल्लेख केले गेले आहे.[]

वैयक्तिक जीवन संपादन

खोडके यांचे कुटुंब एक व्यापारी व जमिनदार कुटुंब होते, इ.स. १५५० मधे सदाशिव राव खोडके हे व्यापारासाठी पैठण येथुन महाडमधे स्थाईक झाले, तेंव्हा महाड हे कोकणातील एक प्रमुख बंदर व व्यापारी केंद्र होते. पोर्तुगीज, इंग्रज, अरब, तुर्की इ. विदेशी व्यापारी कोकणात येत असत. त्यांच्यासोबत खोडके कुटुंबाचा ड्रायफ्रूट्स, मसाले व कापड यांचा व्यापार चालें. खोडके यांचे वडील नरहरी तात्याबा खोडके हे महाड मध्ये परंपरागत सुकामेवा व मसाल्याचा व्यापार करत असत. ते ज्योतिषी सुद्धा होते. खोडके यांचा विवाह सुंदराबाई खोडके यांच्याशी १९३४ मधे झाला. त्यांना मुलगा शशिकुमार व दोन मुली, सुलोचना खांडके व रत्नप्रभा अंबटकर. खोडके वकिलांच्या अष्टपैलूत्वाचा वारसा त्यांचे वारस सुद्धा चालवत आहेत, मुलगा शशिकुमार खोडके हे मॅनेजर,स्टेट बैंक ऑफ इंडिया, व गुंतवणुकदार आहेत.त्यानी अहवेदांतम् पतसंस्थाची स्थापना केली. त्याचे ते चेयरमन होय. पत्नी रत्नप्रभा खोडके (बेबीताई) या महाड मधील राजकिय व सामाजिक नेत्या होत्या.खोडके वकिलांचे नातु अभय कुमार खोडके हे शशिकुमार इंडस्ट्रीजचे मालक व गायक-अभिनेता आहेत, व नात अपर्णा मानकर या फुड व कॉस्मेटिक उत्पादन करणाऱ्या रेडरोवा ग्रुपच्या मालकीण आहेत. तिचा मुलगा प्रित मानकर मॉडल व गायक आहे.साचा:संदर्भ

निधन व सन्मान संपादन

खोडके यांनी १९५७ मध्ये प्रकृती अस्वास्थ्य मुळे वकिली करणे बंद केले. ४ मार्च १९५९ रोजी त्यांचा मृत्यु झाला. त्यांच्या सन्मानार्थ चवदार तळ्याजवळील एका रस्त्याला "ॲड. व्ही.एन. खोडके मार्ग" असे नाव देण्यात आले.साचा:संदर्भ

खोडकेंच्या सन्मानार्थ त्यांची नातवंडे अभय कुमार व सौ.अपर्णा यांच्या " सौ. रत्नप्रभा खोडके युनिवर्सिटीज" या शैक्षणिक संस्थेतर्फे महाड येथे "ॲड. व्ही.एन. खोडके कॉलेज ऑफ लॉ" या महाविद्यालयाची योजना प्रस्तावित आहे.साचा:संदर्भ

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी