Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
मंजुषा कुलकर्णी-पाटील - मराठीपिडिया Jump to content

मंजुषा कुलकर्णी-पाटील

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:४५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट गायक

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही

मंजुषा कुलकर्णी-पाटील (२ नोव्हेंबर १९७१ सांगली, महाराष्ट्र, भारत) ह्या एक हिंदुस्तानी संगीतातील गायिका आहेत.[][][] .त्या ग्वाल्हेर आणि आग्रा घराण्याच्या गायिका आहेत.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही

संगीत शिक्षण[संपादन | स्रोत संपादित करा]

त्यांच्या कुटुंबामध्ये संगीताची परंपरा होतीच,त्यामुळे त्यांचे संगीताचे शिक्षण वयाच्या बाराव्या वर्षी चिंतुबुवा म्हैसकर यांच्याकडे सांगली येथे सुरू झाले.[] त्यांनी अखिल भारतीय बालगंधर्व संगीत महाविद्यालयातून संगीत विषयात मास्टर ऑफ आर्ट्स केले. त्यानंतर त्यांनी ग्वाल्हेर घराण्याचे इचलकरंजी येथील गायक पं.द. वि. काणेबुवा यांच्याकडे गुरुकुल पद्धतीने १३ वर्षे [] शिक्षण घेतले.[][] त्यांच्या निधनानंतर पाटील यांनी काही काल पं.नरेंद्र कणेकर आणि शुभदा पराडकर यांच्याकडे काही काळ संगीत शिक्षण घेतले.लग्नानंतर पुण्यात आल्यावर त्यांनी डॉ.विकास कशाळकर यांच्याकडे शिकण्यास सुरुवात केली. सध्या त्या उल्हास कशाळकर यांच्याकडे संगीत शिक्षण घेत आहेत.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही

कारकीर्द[संपादन | स्रोत संपादित करा]

मंजुषा कुलकर्णी-पाटील त्यांच्या हिंदुस्तानी खयाल गायकीसाठी प्रसिद्ध आहेत.[] त्यांनी १९९८ तसेच २००३ मध्ये सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात, बालगंधर्व, भीमसेन महोत्सव, तानसेन समारोह, धारवाड येथील 'उस्ताद रहमत खॉंसाहेब महोत्सव' अशा व अनेक इतर संगीत महोत्सवांमध्ये आपली कला सादर केली आहे. तसेच भारतातल्या आणि शिकागो, लंडन, सिंगापूर,मस्कत इ. परदेशातल्याही अनेक ठिकाणी आपले शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम केले आहेत.[]

संगीताचार्य द.वि.काणे बुवा प्रतिष्ठान[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:विस्तार त्यांनी आपले गुरू काणे बुवा यांच्या नावाने संगीताचार्य द.वि.काणे बुवा प्रतिष्ठानची स्थापना केली. सर्वसामान्यांपर्यंत हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत पोहोचवणे, हा या संस्थेचा उद्देश आहे. प्रतिष्ठानतर्फे संगीत क्षेत्रातील नवोदित कलाकारांना युवा पुरस्कार तसेच शिष्यवृत्त्या देण्यात येतात. तसेच सांगली येथे गुरुकुल चालवले जाते.[१०]

पुरस्कार[संपादन | स्रोत संपादित करा]

  • पंडित जसराज गौरव पुरस्कार
  • माणिक वर्मा पुरस्कार
  • गुरुवर्य बी. एस. उपाध्ये स्मृती पुरस्कार - 2010
  • संगीत शिरोमणी पुरस्कार 2008 मध्ये.
  • संगीत नाटक अकादमी – उस्ताद बिस्मिल्ला खान पुरस्कार 2012.
  • कुमार गंधर्व पुरस्कार 2016–17

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी