इचलकरंजी
साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र साचा:विकिस्रोत इचलकरंजी शहर महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वसलेले आहे. हे शहर येथील वस्त्रोद्योगामुळे खूप नावारूपास आले आहे.या गावाला महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणून ओळखले जाते.
इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]
इचलकरंजी हे कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातील औद्योगिक शहर आहे. लोकसंख्या २,५७,५७२ (२००१). हे कोल्हापूरपासून सडकेने २३ किमी. पूर्वेस पंचगंगा नदीच्या काठी आहे. इचलकरंजी संस्थानची ही एकेकाळची राजधानी नंतर वस्त्रोद्योगामुळे पुढे आली. इचलकरंजी महाराष्ट्रामधील एक मोठी आणि श्रीमंत नगरपरिषद म्हणून ओळखली जाते. देशभक्त डॉ. रत्नाप्पा कुंभार हे इचलकरंजीतील स्वातंत्र्यसैनिक व पहिले खासदार होते.
वस्त्रोद्योग[संपादन | स्रोत संपादित करा]
येथील यंत्रमागावरील कापड हे उर्वरित भारतात व भारताबाहेर पाठवले जाते. हातरुमाल, परकर, सदरे, धोतरे, गणवेशाचे कापड असे अनेक वस्त्रांचे प्रकार येथे तयार होतात. येथे अंदाजे १ लाख यंत्रमाग व अंदाजे १०,००० अत्याधुनिक धोटे विरहित यंत्रमाग आहेत. दररोज १ कोटी २५ लाख मीटर कापडाचे उत्पादन येथे होते. वस्त्रोद्योगातील वार्षिक उलाढाल अंदाजे २५ हजार कोटी आहे. त्यांशिवाय इचलकरंजी येथे साखर, तेल, यंत्रे इत्यादींचे कारखाने निघाले आहेत. शहरातील तंबाखू, शेंग, गूळ इत्यादींची ही बाजारपेठ असून शिक्षणक्षेत्रातही शहर पुढे आहे.
वस्त्रोद्योगाचा इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]
इचलकरंजीमध्ये पहिला यंत्रमाग कारखाना विठठ्लराव दातार यांनी १९०४ मध्ये व्यंकटेश रंग तंतू मिल या नावाने स्थापन केला. इचलकरंजीच्या विकासातील मैलाचा दगड ठरलेल्या सहकारी इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेटची स्थापना कृष्णदेव साळुंखे आणि फुलचंदशेठ शहा या दोन द्रष्ट्या नेत्यांनी केली.
साहित्य, कला[संपादन | स्रोत संपादित करा]
इचलकरंजीचे संस्थानिक श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांनी आपल्या कारकिर्दीत लोकहिताची अनेक कामे केली.त्यांच्याच काळात इचलकरंजीमध्ये पहिले हातमाग आणण्यात आले.साचा:दुजोरा हवा आहे. त्यांच्या स्मृत्यर्थ इचलकरंजीतील नाट्यगृहाला कै.नारायणराव घोरपडे नाट्यगृह असे नाव देण्यात आले. या नाट्यगृहाजवळ त्यांचा पूर्णाकृती पुतळा सुद्धा आहे. संगीत कला जपणारे पंडीत बाळकृष्ण बुवा स्मृती मंदिर येथे आहे. सुप्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्या स्मृत्यर्थ हे बांधले गेले. १९७४ साली प्रसिद्ध साहित्यिक पु.ल.देशपांडे यांचा अध्यक्षतेखाली अखिल भारतीय साहित्य संमेलन इचलकरंजी येथे पार पडले. इचलकरंजीचे वैभव असलेल्या राजवाड्यात डी.के.टी ई. टेक्सटाईल ॲंड इंजिनिअरिंग इन्स्टिटयूट हे कॉलेज सुरू आहे.१८७० साली नेटिव्ह जनरल लायब्ररी या नावाने सुरू झालेले आणि आता आपटे वाचन मंदिर या नावाने ओळखले जाणारे वाचनालय महाराष्ट्रातील अतिशय जुन्या वाचनालयांपैकी एक आहे.
पुरातन वास्तू[संपादन | स्रोत संपादित करा]
इचलकरंजी शहरात अनेक पुरातन वास्तू, मंदिरे आहेत.
- पुरातन महादेव मंदिर
- विठ्ठल मंदिर
- मरगूबाई मंदिर
- गद्रे दत्त मंदिर
- बिरोबा मंदिर
-
पुरातन महादेव मंदिर
-
पुरातन महादेव मंदिर
-
विठ्ठल मंदिर
-
विठ्ठल मंदिर
-
विठ्ठल मंदिर
-
मरगूबाई मंदिर
-
गद्रे दत्त मंदिर
-
बिरोबा मंदिर
शिक्षणसंस्था[संपादन | स्रोत संपादित करा]
- श्री.सौ.गंगामाई विद्यामंदिर
- श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल
- गोविंदराव हायस्कूल
- जवाहर हायस्कूल, जवाहर नगर
- अशोका हायस्कूल,गणेश नगर
- दत्ताजीराव कदम कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय
- रमा माता विद्यामंदिर
- रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन क्र. २७
- मणेरे हायस्कूल
- विनायक हायस्कूल
- व्यंकटराव हायस्कूल
- शहापूर हायस्कूल
- शाहू हायस्कूल
- सरस्वती हायस्कूल
- नाईट काॅलेज







