माघी
माघी हा पंजाब राज्यातील मकर संक्रमणाचा उत्सव आहे.[१] हा उत्सव हिमाचल प्रदेश येथेही साजरा केला जातो. याला माघी साज्जी असेही म्हटले जाते.[२] बिहार आणि नेपाळ येथे या सणाला माघी पर्व असे नाव आहे. हिंदू कालगणनेनुसार माघ महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सण साजरा केला जातो.
हिमाचल प्रदेश[संपादन | स्रोत संपादित करा]
हिमाचल प्रदेश हा भाग थंड प्रदेशाचा आहे. डोंगरावरील शेती येथे केली जाते. थंडीच्या काळात माघ महिन्यात या सणाला अग्नी या देवतेची पूजा केली जाते. माद्राईसन या देवतेची पूजा करणयासाठी घराची आणि अंगणाची स्वच्छता कली जाते आणि घर सजविले जाते.[३]
शीख धर्म[संपादन | स्रोत संपादित करा]
शीख शर्मातील ४० हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण करणे हा याचा हेतू आहे. मुघल सैन्याशी लढा देताना या वीरांना आलेल्या मृत्यूचे हे स्मरण आहे.[४] मुक्तसर येथे शीख बांधव भेट देतात आणि तळ्याच्या पाण्यात स्नान करतात.[५] मुक्तसर साहिब येथे गुरुद्वारापरिसरात मेळ्याचे आयोजन केले जाते.[६]
पंजाब राज्यात उसाच्या रसात तांदूळ शिजवून केलेली विशेष खीर केली जाते. ही खीर आदल्या दिवशी संध्याकाळी करून ठेवली जाते. दुस-या दिवशी म्हणजे मुख्य उत्सवादिवशी ही खीर दिली जाते आणि त्याच्या बरोबर दह्यात कालविलेली लाल मिरची सोबत वाढली जाते. पंजाबच्या काही भागात मसूर डाळ वापरून खिचडी कली जाते आणि उसाचा रस आणि गूळ सेवन केले जाते. पंजाबात ठिकठिकाणी जत्रेचे आयोजन केले जाते.[७]